''चंद्रकांत पाटलांवर करमणूक कर लावावा''
''चंद्रकांत पाटलांवर करमणूक कर लावावा'' Saam TV
मुंबई/पुणे

''चंद्रकांत पाटलांवर करमणूक कर लावावा''

साम टिव्ही ब्युरो

पुणे: महाराष्ट्रात सध्या राजकारण तापलेलं आहे. भाजप नेते आणि माजी खासदार किरीट (Kirit Somaiya) सोमय्या यांच्या मुंलुंडमधील घरा बाहेरचा ड्रामा आणि कोल्हापुरात जाण्यासाठी त्यांना लावलेली रोक, यामुळे कालचा दिवस ढवळून निघाला. कोल्हापूरात नो एंन्ट्रीची नोटीस जिल्हाधिकाऱ्यांनी काढली होती. यानंतर विरोधी पक्षातून राज्य सरकार (State Government) आरोप केले. त्यानंतर सत्ताधारी पक्षातून विरोधकांवर टीका केली जात आहे.

राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश आध्यक्ष रुपाली चाकणकरांनी भाजपचे प्रदेशाद्धक्ष चंद्रकांत पाटलांवर टीका केली आहे. त्या ट्विट करत म्हणाल्या '' चंद्रकांत दादा पाटील हे महाराष्ट्राच्या राजकारणाला पडलेलं एक गोड स्वप्न आहे. कारण त्यांच्यामुळे महाराष्ट्रात सध्याला निखळ मनोरंजन होत आहे. महाराष्ट्राचे वित्तमंत्री म्हणून अजित दादांना माझी विनंती आहे की त्यांनी चंद्रकांतदादांवर करमणूक कर लावावा.

दरम्यान किरीट सोमय्या काल रात्री कराडला पोहचले तिथे पोहचल्या नंतर त्यांना सातारा पोलिसांनी रोखले. सकाळी त्यांनी पत्रकार परिषद देखील घेतली. सकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी परत हसन मुश्रिफ यांनी टारगेट केले, त्यांच्यावर आरोप गंभीर आरोप केले. त्याचबरोबर रश्मी ठाकरेंवर देखील गंभीप आरोप केले आहेत. आणखी दोन नेत्यांचे घोटाळे बाहेर काढणार असल्याचही सोमय्या पत्रकार परिषदेत म्हणाले.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Uddhav Thackeray : घरी गेलं की आई विचारते नोकरी मिळाली का? तुमच्या नादी लागून १० वर्ष गेली; पालघरमधून उद्धव ठाकरे कडाडले

Pune News: तुमचं नाव मनी लॉन्ड्रिंगमध्ये..., पोलिस कारवाईची भीती दाखवत तरुणाला घातला २९ लाखांचा गंडा

Today's Marathi News Live : उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक पाटील यांना अखेर अटक

Smart TV खरेदी करताना या गोष्टी ठेवा लक्षात, होईल फायदा

DHFL: 34000 कोटींच्या बँक घोटाळ्या प्रकरणी CBI ची मोठी कारवाई, DHFL चे माजी संचालक धीरज वाधवान यांना अटक

SCROLL FOR NEXT