Manasvi Choudhary
सकाळच्या वेळी योगासने केल्याने केवळ शरीरच नाही, तर मन आणि डोकंही दिवसभर शांत राहण्यास मदत होते.
मानसिक शांतता आणि एकाग्रता हवी असेल, तर दररोज सकाळी फक्त ३० मिनिटे
सरळ ताठ उभे राहून दोन्ही हात वर करून हाताचे बोटे एकमेकांत गुफंवा. टांचा उंच करून संपूर्ण शरीराचा भार पायाच्या बोटांवर घ्या हा ताडासन प्रकार आहे जो नियमित केल्याने शरीराला आराम मिळतो.
वृक्षासन केल्याने मनाला शांत वाटते एका पायावर उभे राहून दुसऱ्या पायाचा तळवा उभ्या असलेल्या पायाच्या मांडीवर ठेवा. दोन्ही हात जोडून छातीपाशी किंवा डोक्यावर घ्या. डोळे एका जागी स्थिर ठेवा.
जमिनीवर पाठीवर शांत झोपा. हात आणि पाय थोडे लांब ठेवा. डोळे मिटून संपूर्ण शरीराला सैल सोडा आणि केवळ श्वासावर लक्ष केंद्रित करा. शवासन केल्याने मन शांत होते आणि थकवा निघून जातो.
सर्वप्रथम जमिनीवर पालथे झोपा आपले दोन्ही हात छातीच्या बाजूला ठेवा. हाताचे तळवे जमिनीवर घट्ट टेकलेले असावेत. श्वास सोडत, हातावर आणि पायाच्या बोटांवर जोर देऊन संपूर्ण शरीर जमिनीपासून वर उचला.संतुलनासन केल्याने निद्रानाश, मायग्रेन, ऑस्टिओपोरोसिस यासारख्या समस्यांवर मात करता येते.
डोळे मिटून कानांवर बोटे ठेवा. दीर्घ श्वास घेऊन सोडताना भुंग्यासारखा 'गुंजन' आवाज करा. या आवाजामुळे डोकं आणि मन काही सेकंदात शांत होते.