Manasvi Choudhary
बदलेली जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी यामुळे लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच वजन वाढीची समस्या भेडसावते आहे.
वजन वाढण्यामागचे सर्वात मुख्य कारण म्हणजे तुम्ही जे काही खाता त्याचे परिणाम दिसून येतात. तुम्ही खाण्यापिण्यावर कंट्रोल ठेवणे गरजेचे आहे.
तुम्ही काय खाता यापेक्षा किती खाता हे महत्त्वाचे आहे. नेहमीपेक्षा कमी आहार केल्याने वजनामध्ये फरक दिसून येईल.
जेवणापूर्वी ३० मिनिटे आधी किमान २ ग्लास पाणी प्या. यामुळे भूक कमी लागते आणि पचन सुधारते.
साखर आणि गोड पदार्थ रक्तातील इन्सुलिन वाढवतात, ज्यामुळे चरबी साठते. साखरेऐवजी गूळ किंवा मध मर्यादित प्रमाणात वापरा.
रात्रीचे जेवण झोपण्यापूर्वी किमान ३ तास आधी करा. रात्री शक्यतो सूप, मुगाची खिचडी किंवा कडधान्ये यांसारखे हलके पदार्थ खावेत.
आहारात पनीर, सोयाबीन, डाळी आणि अंडी यांचा समावेश करा. प्रोटीन पचायला जास्त वेळ घेते, त्यामुळे वारंवार भूक लागत नाही आणि स्नायूंचे आरोग्य टिकून राहते.