rte admission online process begins from today in maharashtra  Saam Digital
मुंबई/पुणे

RTE Admission : पालकांनाे! ‘आरटीई’ प्रवेश प्रक्रियेस प्रारंभ; ऑनलाइन अर्ज करण्यासाठी जाणून घ्या संकेतस्थळ

राज्यात ही प्रवेशाची प्रक्रिया कधी सुरु हाेणार याची पालकांकडून सातत्याने विचारणा हाेत हाेती. अखेर शिक्षण विभागाने प्रवेश प्रक्रिया जाहीर केली आहे.

Siddharth Latkar

- सागर आव्हाड

Pune :

शिक्षण हक्क कायद्यानुसार २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशाची प्रक्रिया अखेर प्राथमिक शिक्षण विभागाने आजपासून (साेमवार) सुरू केली आहे. या निर्णयामुळे शाळा प्रवेशासाठी पालकांना आरटीई २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी आजपासून ऑनलाइन अर्ज करता येणे शक्य झाले आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षण हक्क अधिकार कायद्यानुसार (आरटीई) आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकातील विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागा राखीव ठेवल्या जातात. दरवर्षी राज्यातील लाखो पालक आरटीईअंतर्गत होणाऱ्या या प्रवेश प्रक्रियेच्या प्रतीक्षेत असतात. (Maharashtra News)

राज्यात ही प्रवेशाची प्रक्रिया कधी सुरु हाेणार याची पालकांकडून सातत्याने विचारणा हाेत हाेती. अखेर शिक्षण विभागाने प्रवेश प्रक्रिया जाहीर केली आहे. यामुळे पालकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. पालकांनी ऑनलाइन प्रवेश अर्ज भरण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी https://student.maharashtra.gov.in/adm_portal या संकेतस्थळावर भेट द्यावी असे आवाहन प्राथमिक शिक्षण विभागाने केले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Smartphone battery life: मोबाइलची बॅटरी किती टक्के झाल्यावर चार्जिंगला लावावी?

Maharashtra : राज्य सरकारचा मोठा निर्णय! सर्व विभागांच्या खर्चात २० टक्के कपातीचे निर्देश

Curry Leaves Water Benefits: सकाळी रिकाम्या पोटी प्या कढीपत्त्याचे पाणी; होतील 'हे' भन्नाट फायदे

EPFO Update: नव्या कर्मचाऱ्यांना मिळणार ₹15,000! हप्ता मिळवण्यासाठी लगेच करा हे काम

Maharashtra News Live Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरसंघचालक मोहन भागवत यांच्या भेटीला

SCROLL FOR NEXT