Breaking : दक्षिण आफ्रिकेतून पुण्यात आलेल्या नागरिकाची RT-PCR टेस्ट पॉझिटिव्ह Saam Tv
मुंबई/पुणे

Breaking : दक्षिण आफ्रिकेतून पुण्यात आलेल्या नागरिकाची RT-PCR टेस्ट पॉझिटिव्ह

पुण्यामध्ये काही दिवसाअगोदर दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या एका प्रवाशावर महापालिकेने विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आले

अश्विनी जाधव-केदारी, साम टीव्ही, पुणे

अश्विनी जाधव- केदारी

पुणे : पुण्यामध्ये काही दिवसाअगोदर दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या एका प्रवाशावर महापालिकेने विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आले होते. त्याला घरामध्येच विलगीकरणात (होम क्वारंटाईन) राहण्याच्या सूचना देण्यात आले होते. काल त्याची आरटीपीसीआर चाचणी महापालिकेने केली असून, त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये ओमायक्रॉन हा नवा विषाणू आहे की नाही हे तपासण्यासाठी 'जीनोम सिक्वेन्सिंग' करावे लागणार असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

हे देखील पहा-

दक्षिण आफ्रिकेमधील कोव्हीड विषाणूच्या उत्परीवर्तीत प्रकाराचा ओमायक्रॉन विषाणूचा धोका लक्षात घेऊन, महापालिकेने परदेशामधून आलेल्या नागरिकांवर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात येत आहे. तसेच दक्षिण आफ्रिकेसह हॉंगकॉंग, ऑस्ट्रिया, झिंम्बाब्वे, जर्मनी, ईस्त्राईल या देशात कोण नागरिक आले आहेत का? याची माहिती सध्या महापालिका गोळा करत आहे. जगभरात सध्या कोरोनाच्या नव्या ओमायक्रॉन विषाणूचा धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राज्य सरकारला योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना दिले आहेत.

यानुसार महापालिकेनं शहरामध्ये परदेशातून आलेल्या नागरिकांवर लक्ष केंद्रीत केले आहे. विमानतळ प्रशासनाकडून पुण्यात या देशातून आलेल्या नागरिकांची माहिती मागविली आहे. यामध्ये एक नागरीक २० दिवसाअगोदर दक्षिण आफ्रिकेमधून पुण्यात आला असून, त्याचा शोध लागला आहे़. त्यामुळे त्याला त्याचा तपासणी अहवाल येइपर्यंत पुढील ८ ते १० दिवस घरीच राहण्याच्या सूचना देण्यात आले आहेत.

कोरोनाची सध्याची पुण्यातील आकडेवारी-

३० नोव्हेंबर

-दिवसभरात ७८ पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.

- दिवसभरात ८४ रुग्णांना डिस्चार्ज.

- पुणे शहरात करोनाबाधीत ०० रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील ०१.

-९७ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

- पुण्यात एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या ५०६६९९.

- पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ८२४.

- एकूण मृत्यू -९१०३.

-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- ४९६७७२.

- आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ३८६९.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सरकार चालढकल करतेय; माणिकराव ठाकरे यांचा आरोप

Pune Accident : डान्सर गौतमी पाटीलच्या कारचा अपघात, मुंबई-बेंगळूरू महामार्गावर घडली दुर्घटना

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या मदतीसाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा १ कोटी रुपयांचा निधी

Wednesday Horoscope: देवीच्या कृपेने आर्थिक बाजू सुधारण्यासह जीवनातील अडचणी दूर होतील; वाचा मेष ते मीनचे राशिभविष्य

Bhayandar Tourism : वीकेंडचा प्लान ठरला; भाईंदरमध्ये लपलाय सुंदर किनारा, पाहताच मनाला भुरळ पडेल

SCROLL FOR NEXT