Mumbai News : ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. यासाठी सायबर ठग वेगवेगळ्या क्लुप्त्या शोधून काढत असतात. मुंबईत असाच एक फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे.
एका व्यावसायिक महिलेच्या भावाला दोन केकसाठी सव्वा लाख मोजावे लागले आहेत. सायबर ठगांनी 1.3 लाख रुपयांना गंडा घातला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्यांच्या बँक खात्याचा तपशील गोळा करत आहेत.
तक्रारदार तेजस हिंदुजा याच्या बहिणीचा केक बेकिंगचा व्यवसाय आहे. 14 ऑगस्ट रोजी त्यांना अंकित नावाच्या व्यक्तीचा फोन आला. त्याला दोन केकची ऑर्डर द्यायची होती. केकची किंमत प्रत्येकी 2000 रुपये होती. फोन करणार्याने पैसे त्याचा मित्र राहुल देईल असं सांगितलं. दहा मिनिटांनंतर राहुलने कॉल केला आणि पेमेंट अॅपद्वारे पेमेंट करणार असल्याचे सांगितले. (Maharashtra News)
एका व्यक्तीने स्वतःची राहुल म्हणून ओळख करून दिली आणि तो म्हणाला की तो सैन्यात नोकरीला आहे. माझ्या अॅपवर पैसे रिसिव्ह होईपर्यंत तो पेमेंट करू शकत नाही, म्हणून त्याने तेजसला काही पैसे पाठवायला सांगितले. त्यावेळी तेजसने 13,650 रुपये पाठवले. मात्र राहुलने त्याला पैसे आले नाही असं सांगितलं. (Crime News)
त्याने तेजसला पुन्हा पैसे पाठवण्याची विनंती केली. तेजसने तेवढीच रक्कम पुन्हा पाठवली. परंतु राहुलने पुन्हा पैसे आले नसल्याचं सांगितलं. आता राहुलने तेजसला मोठी रक्कम पाठवण्यास सांगितले. तेजसने त्याला 40,950 रुपये पाठवले. पुन्हा राहुलने त्याला पैसे मिळाले नाही असं सांगितसं.
आरोपीने अशारीतीने तेजसकडून तब्बल 1.3 लाख रुपये घेतले. त्यानेतर तेजसने राहुलला फोन केला असता त्याने कॉल डिस्कनेक्ट केला. तेजसने माहीम पोलिसांत तक्रार दाखल केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.