smita patil  Saam tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics : मुलगी वडिलांना कधीच प्रश्न विचारत नाही; अजित पवारांच्या आरोपांवर स्मिता पाटील भरभरून बोलल्या

smita patil on ajit pawar : अजित पवारांच्या आरोपांवर स्मिता पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवारांच्या वक्तव्यानंतर आर आर पाटील यांचं कुटुंब दुखावलं आहे.

गोपाल मोटघरे

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आर आर पाटील यांच्यावरील वक्तव्यामुळे राजकारण ढवळून निघालं आहे. अजित पवारांच्या वक्तव्यामुळे आरोप-प्रत्यारोपाला सुरुवात झाली आहे. अजित पवारांच्या वक्तव्यामुळे सिंचन घोटाळा प्रकरणाचा मुद्दा चर्चेत आला आहे. सिंचन घोटाळा प्रकरणावरून आर आर पाटील यांनी केसांनी गळा कापल्याचं वक्तव्य अजित पवारांनी केलं. अजित पवारांच्या वक्तव्यानंतर आर आर पाटील यांचं कुटुंब दुखावलं आहे. अजित पवारांच्या वक्तव्यावर आर आर पाटील यांची कन्या स्मिता यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

उप मुख्यमंत्री अजित पवारांनी त्यांचे सहकारी असलेल्या दिवंगत आर आर पाटील ( आबा ) यांच्या बद्दल जाहीर सभेत केलेल्या वक्तव्यामुळे त्यांचं कुटुंब दुखावलं गेलं आहे. आबा पाटील यांची कन्या स्मिता यांनी अजित पवारांच्या वक्तव्यावर भाष्य केलं.

'आबांना जाऊन साडेनऊ वर्षे झाली आहेत. त्यानंतर अजित पवार असं वक्तव्य करतात. खरंतर आबा गेल्यानंतर आम्हा कुटुंबीयांचं पालकत्व अजितदादांनी स्वीकारलं होतं. निवडणुकीच्या तोंडावर असं वक्तव्य करणं अत्यंत चुकीचं आहे. आबांनी त्या कागदपत्रांवर सही केली किंवा नाही हे आम्हा कुटुंबीयांना माहिती नाही. जरी आबांनी त्यावर सही केली असेल, तर त्याच्यामध्ये काहीतरी असावं, यांची नि:पक्षपणे चौकशी व्हावी. या हेतूनेच आबांनी त्यावर सही केली असावी असं आम्हाला वाटते, असा दावा स्मिता पाटील यांनी केला आहे.

'अजित पवारांना बोलण्याइतपत मी मोठी नाही, कोणतीही मुलगी आपल्या वडिलांना कधीच प्रश्न विचारत नाही, अशा भावना व्यक्त करत दिवंगत आबा यांची मुलगी स्मिता पाटील यांनी खेद व्यक्त केला आहे.

रोहित पाटील काय म्हणाले?

अजित पवारांच्या वक्तव्यावर भाष्य करताना रोहित पाटील म्हणाले, 'गृहमंत्री,उपमुख्यमंत्री असताना माझ्या वडिलांना कोणी त्रास दिला, याबाबत मला माहीत आहे. योग्यवेळी त्याचं योग्य उत्तर देऊ, अशा शब्दात रोहित आर आर पाटील यांनी अप्रत्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवारांवर निशाणा साधला आहे.

'वडील हयात असताना त्यांना मानसिक त्रास काय काय झाला? आबा त्यांच्या पुण्यातील मित्रांच्या खांद्यावर डोके ठेवून रडायचे. मला आबांच्या मित्रांनी सांगितलंय. कोण त्रास द्यायचं याचं उत्तर योग्य वेळी देऊ,असं रोहित पाटील यांनी स्पष्ट केलं. ते तासगावच्या ढवळी येथे प्रचार शुभारंभाच्या सभेमध्ये बोलत होतेत. अजित पवारांनी तासगावमधून आर आर आबांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून रोहित पाटलांनी हा निशाणा साधला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आयोध्येनंतर बाळूमामा देवस्थानातही घोटाळा, देवस्थानात कोट्यवधींचा आर्थिक गैरव्यवहार?

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट; कर्जमुक्ती योजनेतील पहिली मोठी यादी जाहीर, तुमचं नाव आहे का?

Maharashtra News Live Update: आषाढी यात्रेच्या निमित्ताने पंढरपूर नगरी सजली

मोठी बातमी! केंद्रीय मंत्र्यांचा तडकाफडकी राजीनामा, राष्ट्रपतींकडून मंजुरी, राजकारणात खळबळ

IVF उपचार घेण्याच्या विचारात आहात? कोणत्या टेस्ट होतात, किती येतो खर्च?

SCROLL FOR NEXT