Pune : "पुण्यात होणार RPI चा महापौर"
Pune : "पुण्यात होणार RPI चा महापौर"  सागर आव्हाड
मुंबई/पुणे

Pune : "पुण्यात होणार RPI चा महापौर"

सागर आव्हाड साम टीव्ही पुणे

पुणे : आगामी महापालिका निवडणुकीत यश मिळाल्यास पुणे महापालिकेत आरपीआय पक्षाचा महापौर होईल. याकरता देंवेंद्र फडणवीस यांनी शब्द दिला आहे, असे रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) युवक आघाडी पुणे जिल्हातर्फे पुण्यनगरीच्या उपमहापौर सुनीता वाडेकर यांचा नागरी सत्कार समारंभ पार पडला.

हे देखील पहा :

या कार्यक्रमात पुणे शहरातील कोरोना योद्ध्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच उमेश कांबळे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन आठवले यांच्या हस्ते झाले. बावधन बुद्रुक येथील माता रमाई आंबेडकर चौकात झालेल्या या सोहळ्यावेळी 'रिपाइं'चे प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, शहराध्यक्ष संजय सोनावणे, ऍड. मंदार जोशी, जिल्हाध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, कार्याध्यक्ष बसवराज गायकवाड, माहिपाल वाघमारे, उमेश कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

मागील निवडणुकीत पुणे महापालिकेत भाजपसोबत राहुन महापालिकेत सत्ता मिळाल्यावर उपमहापौर पद हे आरपीय गटाल दिले गेले होते. पण येणाऱ्या निवडणुकीत यश मिळाल्यानतंर महापौर पदाकरता जर अनुसूचित जातीचे आरक्षण पडल्यास महापौर पद हे आरपीआयला दिले जाईल असे आश्वासन विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देंवेद्र फडणवीस यांनी दिले असल्याचे आठवले यांनी सांगितले.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live: पुण्यात धंगेकरानंतर भाजपच्या पदाधिकाऱ्यांवरही गुन्हे दाखल

Amla Benefits: मधुमेहींसाठी आवळा ठरेल रामबाण उपाय; फायदे एकदा वाचा

Nayak 2 : 'नायक २' मध्ये पुन्हा एकदा दिसणार अनिल कपूर-राणी मुखर्जीची केमिस्ट्री?, निर्मात्यांनी केली महत्वाचा खुलासा

Amravati: गढूळ पाण्यावरुन वडनेर गंगाई ग्रामस्थांचा दर्यापूर जीवन प्राधिकरण कार्यालयावर राेष, उपविभागीय अभियंत्यांना दिला इशारा

Uddhav Thackeray : भाजप आरएसएसवर बंदी आणेल; उद्धव ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर बाण

SCROLL FOR NEXT