Mumbai Crime News
Mumbai Crime News  Saam TV
मुंबई/पुणे

धक्कादायक: हॉटेलमध्ये आढळला ७ वर्षीय मुलीचा कुजलेला मृतदेह, आई गंभीर जखमी

चेतन इंगळे

मुंबई : मीरा रोड (Mira Road) येथील काशी मीरा परिसरात असलेल्या सीजन हॉटेलमध्ये सात वर्षीय मुलीचा मृतदेह आढळून आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सीजन हॉटेलमध्ये (Season Hotel) ७ वर्षीय मुलीचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह हॉटेलमधील कर्मचाऱ्यांना आढळून आला. तसंच मुलीची आई गंभीर जखमी अवस्थेत दिसून आली आहे.

मयत मुलीचे वडील हॉटेलमधून बाहेर निघून गेले, तेव्हा हॉटेल रूममधून मुलीची आई मदतीसाठी ओरडू लागली. हॉटेलमधील (Hotel) कर्मचाऱ्यांनी डुप्लिकेट चावीच्या मदतीने दरवाजा खोलला तेव्हा त्यांना संपूर्ण प्रकार कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आला.

हे देखील पाहा -

या हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी तात्काळ काशी मीरा पोलिसांना (Kashi Meera Police) घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत. गंभीर जखमी झालेल्या मुलीच्या आईला नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून, ७ वर्षीय मुलीचा मृतदेह शवविच्छेदना साठी पाठवण्यात आला आहे. या संपूर्ण घटनेत वडील फरार असून, पुढील तपास काशी मीरा पोलीस (Police) करत आहेत.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lok Sabha Election: तिसरा टप्पा BJP साठी महत्त्वाचा, 2019 मध्ये याच टप्प्यात मिळालं होतं मोठं यश; यंदा काय आहे राजकीय परिस्थिती?

MI vs SRH,IPL 2024: हैदराबादवर सूर्या कोपला! मुंबईचा विजयी 'तिलक', प्ले ऑफची समीकरणंच विस्कटली

Esha Gupta च्या बोल्ड फोटोंची एकचं चर्चा, फोटो पाहून चाहते थक्क

Custard Apple Benefits : डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी सीताफळ उपयुक्त; जाणून घ्या आरोग्यदायी फायदे

Special Report : बारामतीत मडकं फोडणारा "तो" कार्यकर्ता कोण?

SCROLL FOR NEXT