म्हाडाचा पेपर रद्द करण्याचा निर्णय विद्यार्थ्यांच्या हीतासाठीच; रोहीत पवारांकडून आव्हाडांची पाठराखन SaamTV
मुंबई/पुणे

म्हाडाचा पेपर रद्द करण्याचा निर्णय विद्यार्थ्यांच्या हीतासाठीच; रोहीत पवारांकडून आव्हाडांची पाठराखन

म्हाडाचा पेपर अचानाक रद्द करण्यात आल्याने राज्यभरातील म्हाडाचा पेपर देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट पहायला मिळत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रश्मी पुराणीक -

मुंबई : आरोग्य भरती परीक्षेत घोटाळा (Health Recruitment Exam Scam) झाल्यानंतर आता म्हाडाच्या परिक्षांमध्ये (MHADA exams) संशय आल्याने म्हाडाचा पेपर देखील अचानाक रद्द करण्यात आला आहे, त्यामुळे राज्यभरातील म्हाडाचा पेपर देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट पहायला मिळत आहेच. शिवाय महाविकास आघाडीचा हा भोंगळ कारभार थांबणार कधी? तसंच या राज्यात सरकार नावाची यंत्रणा कार्यन्वित आहे की नाही? असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपस्थित केला होता.

हे देखील पहा -

दरम्यान सर्वच स्थरातून होणाऱ्या टीकांच गांभीर्य लक्षात घेता आता या प्रकरणामध्ये आमदार रोहीत पवारांनी (MLA Rohit Pawar) जितेंद्र आव्हाडांच (Jitendra Avhad) समर्थनात ट्विट केलं आहे. पवारांनी आपल्या ट्विटमध्ये (Tweet) लिहलं आहे. 'परीक्षा देणारे विद्यार्थी परीक्षेच्या दिवशी सकाळी उठताच त्यांना परीक्षा पुढे ढकलली गेल्याचं कळत असेल तर हे नक्कीच दुर्दैवी आहे. मात्र परीक्षा पुढे ढकलण्याचं कारणही तेवढंच महत्वाचं आहे. कारण मोठ्या मेहनतीने परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये यासाठीच चुकीच्या गोष्टींची कुणकुण लागताच आव्हाड साहेबांनी स्पष्ट भूमिका घेत परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

शिवाय परीक्षा पुढं ढकलण्याचा घेतलेला निर्णय विद्यार्थ्यांसाठी आज अडचणीचा वाटत असला तरी त्यात विद्यार्थ्यांचंच हित आहे. परंतु एवढ्यावरच थांबून चालणार नाही, तर विद्यार्थ्यांची लूट करणारे व्यवस्थेतील दलाल शोधून संपूर्ण व्यवस्थाच स्वच्छ करावी लागणार आहे. सर्वच परीक्षा #MPSC अंतर्गत आणणं हाच यावर उपाय असू शकतो. हे तातडीने करणं तांत्रिकदृष्टया शक्य नसलं तरी टप्प्याटप्प्याने प्रयत्न होणे गरजेचे आहे.

शासन याबाबतीत नक्कीच सकारात्मक काम करत असलं तरी यासंदर्भात अपेक्षित वेगाने मात्र काम होताना दिसत नसल्याची खंत प्रत्येक युवकासह माझ्या मनातही आहे. तसंच लवकरात लवकर सर्व परीक्षा #MPSC अंतर्गत आणण्यासाठी एक निश्चित असा कालबद्ध कार्यक्रम आखावा अशी विनंती देखील त्यांनी ट्विटद्वारे केली आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

VIDEO : कोल्हापुरात औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार जखमी, घटना कॅमेऱ्यात कैद

Jharkhand Results 2024 : झारखंडमध्ये इंडिया आघाडीची सरशी; हेमंत सोरेन आणि कल्पना यांची जोडी ठरली सुपरहिट

Maharashtra Election Result: देवेंद्र फडणवीसांनी चक्रव्यूह भेदलं! विधानसभा निवडणुकीत विरोधक चारही मुंड्या चीत

Maharashtra Election Result: बारामतीचा दादा 'अजितदादा'! लोकसभेला काका, विधानसभेला पुतण्या

Mahrashtra Election Result : हूश्श! अखेर रोहित पवार विजयी झाले

SCROLL FOR NEXT