हे सरकार जनसामान्यांचे नाही, तर दलालांचे सरकार - विक्रांत पाटील

परीक्षा रद्द करण्यात आल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री रात्री दोन वाजता केवळ एका व्हिडिओ बाईटच्या माध्यमातून देतात हे मोठं दुर्दैव आहे.
हे सरकार जनसामान्यांचे नाही, तर दलालांचे सरकार - विक्रांत पाटील
हे सरकार जनसामान्यांचे नाही, तर दलालांचे सरकार - विक्रांत पाटीलरामनाथ दवणे
Published On

मुंबई - म्हाडाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत अशी माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. म्हाडाच्या व इतर परीक्षा काही अपरिहार्य आणि तांत्रिक अडचणींमुळे पुढे ढकलण्यात आल्या असून या परीक्षा आता जानेवारीमध्ये होणार आहेत. आज राज्यभरात म्हाडाचा पेपर होणार होता. पेपर फुटल्याच संशय आल्यानंतर हा पेपर रद्द करण्यात आला. यावर भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी तिखट शब्दात टीका केला आहे.

हे देखील पहा -

विक्रांत पाटील म्हणले की, राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी त्यांचे नेते शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांच्या आयुष्याचं वाटोळं करणारी भेट विद्यार्थ्यांना दिली आहे. विद्यार्थ्यांच्या आयुष्याची राख रांगोळी करण्याची एकही संधी राज्यातील हे सरकार सोडताना दिसत नाही. हे सरकार उत्कृष्ट कामगिरी करत असेल तर फक्त खंडणी आणि दलाली वसुली मध्ये, बाकी विद्यार्थ्यांच्या सर्वच प्रश्नात अपयशी ठरलेले हे सरकार आहे. आज होणाऱ्या म्हाडाच्या परीक्षा रद्द करण्यात आल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री रात्री दोन वाजता केवळ एका व्हिडिओ बाईटच्या माध्यमातून देतात हे मोठं दुर्दैव आहे.

हे सरकार जनसामान्यांचे नाही, तर दलालांचे सरकार - विक्रांत पाटील
म्हाडाचा पेपर मोठ्या रकमेला विकला जाणार होता; पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांची माहिती

पुढे ते म्हणले की, आरोग्य सेवक भरती परीक्षेतही चार वेळा असे प्रकार झाले, आता म्हाडाच्या परीक्षामध्ये सुद्धा तोच प्रकार हे सरकार जनसामान्यांचे नाही,तर दलालांचे सरकार आहे या गोष्टीवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झालेला आहे असा गंभीर आरोप विक्रांत पाटील यांनी केला आहे.

या सर्व परीक्षा एमपीएससी आयोगाच्या माध्यमातून घ्या अशी मागणी विद्यार्थ्यांची असताना खाजगी कंपन्यांच्या माध्यमातून स्वतःचे आर्थिक हितसंबंध जपण्यासाठी सरकार हे रॅकेट चालवत असल्याचे दिसते. भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने या गोष्टीचा तीव्र निषेध करत विक्रांत पाटील यांनी राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com