Rohit Pawar Saam TV
मुंबई/पुणे

Rohit Pawar News : अजितदादा, सुप्रिया ताईंनंतर आता रोहितदादा 'भावी मुख्यमंत्री'; पुण्यातील बॅनरमुळे चर्चांना उधाण

Political News : रोहित पवारांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना त्यांचा उल्लेख भावी मुख्यमंत्री असा करण्यात आला आहे.

दिलीप कांबळे

Pune News :

राष्ट्रवादीतील फुटीनंतर रोहित पवार आक्रमक झालेले दिसत आहेत. बड्या नेत्यांनी पक्षाची साथ सोडल्याने आता रोहित पवारांवर पक्षात मोठी जबाबदारी आहे. आता अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यानंतर पवार कुटुंबियातून आणखी एक भावी मुख्यमंत्री पदाच्या रांगेत आले आहेत. पहिल्यांदाच आमदार झालेले रोहित पवार यांचा भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख करण्यात आला आहे.

रोहित पवारांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना त्यांचा उल्लेख भावी मुख्यमंत्री असा करण्यात आला आहे. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील उर्से टोल नाक्यावर लागलेले हे फ्लेक्स सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत. (Latest Marathi News)

रोहित पवार समर्थकाने वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे हे फ्लेक्स झळकावले आहेत. रोहित पवारांना अजित पवारांची जागा घ्यायची आहे, असा गौप्यस्फोट अजितदादांच्या समर्थक पदाधिकारी आणि आमदारांनी केला होता. आज भावी मुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छांच्या निमित्ताने यावर शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा सध्या रंगलेली आहे. (Political News)

बॅनरवर काय लिहिले?

'महाराष्ट्र राज्याचे नव्या विचाराचे, अभ्यासू युवा नेतृत्व भावी मुख्यमंत्री आमदार रोहित पवार...'. योगे राजाराम कामठे यांनी हे बॅनर लावले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Traffic: मुंबईत तयार होतोय केबल- स्टे ब्रिज, मढ-वर्सोवा दीड तासांचा प्रवास होणार फक्त १० मिनिटांत

Municipal Corporations Election: महापालिकांवर कब्जा, त्याचा मंत्रालयावर झेंडा, 9 महापालिका ठरवणार राज्याचा 'किंगमेकर'

Uddhav- Raj Alliance: ठाकरेंच्या युतीचा मुहूर्त ठरला; भाजप-शिंदेसेनेला टक्कर देण्यासाठी ठाकरे बंधुंची रणनीती काय?

Fact Check : तुमचं व्हॉट्सअॅप हॅक होतंय? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? VIDEO

शिक्षक भरती घोटाळा: आणखी एका शिक्षणाधिकाऱ्याला अटक; 12 कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप

SCROLL FOR NEXT