pune Crime News saam tv
मुंबई/पुणे

Pune : काकीनाडा एक्सप्रेसमध्ये मोठा दरोडा; दरोडेखोरांनी शस्त्रांचा धाक दाखवून केली लाखो रुपयांची लूट

पुणे - सोलापूर लोहमार्गावर काकीनाडा एक्सप्रेसमध्ये दरोड्याची मोठी घटना घडली आहे.

साम टिव्ही ब्युरो

Pune Crime News : पुणे - सोलापूर लोहमार्गावर काकीनाडा एक्सप्रेसमध्ये दरोड्याची मोठी घटना घडली आहे. दरोडोखोरांनी एक्सप्रेसमधील तीन डब्ब्यांमधील प्रवाशांचे दागिने लुटले आहेत. या घटनेमुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. एका महिला प्रवाशाचे तब्बल पावणे तीन लाख रूपयांचे दागिने लुटण्यात आले आहे. (Latest Marathi News)

लोकमान्य टिळक टर्मिनस - काकीनाडा एक्सप्रेस १५ डिसेंबर रोजी दौंड रेल्वे स्थानक सोडले. त्यानंतर एक्सप्रेस बोरीबेल व मलठण (ता. दौंड) रेल्वे स्थानकाच्या दरम्यान संध्याकाळी थांबली होती. तीन ते चार चोरट्यांनी एक्सप्रेसच्या खिडक्या उघड्या आहेत, त्यात हात घालून लूट केली.

या दोन डब्ब्यांमध्ये शस्त्रांचा धाक दाखवून लूट झाल्याची प्राथमिक माहिती आहे. एक्सप्रेसमधील एस - ७ या आरक्षित डब्ब्यातील प्रवासी गीता धनराज गाणसी (वय ३३, आंध्र प्रदेश) यांच्या गळ्यात अडकविलेली पर्स चोरण्यात आली.

गीता यांच्या पर्समध्ये सोन्याचा हार, साखळी, ब्रेसलेट, कर्णफुले, नथ, रोख दहा हजार रूपये ,असा एकूण २ लाथ ७८ हजार २५० रूपयांचा ऐवज होता. त्याचप्रमाणे एक्सप्रेसच्या एस - १ व एस - ६ या प्रवासी डब्ब्यांमधील प्रवाशांचे सोन्याचे दागिने, मौल्यवान वस्तू व रोकड चोरण्यात आली आहे.

दौंड लोहमार्ग पोलिस (Police) ठाण्यात गीता गाणसी यांच्या फिर्यादीनुसार तीन ते चार अज्ञातांविरूध्द १६ डिसेंबर रोजी जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणाचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. तसेच पुणे लोहमार्ग पोलिस व रेल्वे सुरक्षा दलाच्या वरिष्ठांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palghar : पालघरमधील एमआयडीसीत कंपनीला भीषण आग | VIDEO

Maharashtra Live News Update : विदर्भातील सात जिल्ह्यात आज जोरदार पावसाचा इशारा

Maggi History: मॅगीचा शोध कोणी लावला?

EPFO Balance: पीएफ अकाउंटमध्ये किती पैसे जमा झाले? मिस्ड कॉल, SMS वरुन चुटकीसरशी करा चेक

Beed : व्याजाची रक्कम देऊनही सावकाराचा त्रास; सावकाराचे नाव चिठ्ठीत लिहून संपवले जीवन

SCROLL FOR NEXT