Mumbai : मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; लेडीज बारवर छापा, भूयारात दिसलं धक्कादायक दृश्य

मुंबई पोलिसांनी दहिसरमध्ये रेस्टॉरंटमध्ये अवैधरित्या सुरू असलेल्या लेडीज बारवर छापा टाकला आहे.
Mumbai Crime News
Mumbai Crime News Saam Tv
Published On

Mumbai Crime News : मुंबई पोलिसांनी दहिसरमध्ये रेस्टॉरंटमध्ये अवैधरित्या सुरू असलेल्या लेडीज बारवर छापा टाकला आहे. या छाप्यात पोलिसांनी २५ जणांना अटक केली आहे. दहिसर पोलिसांनी शुक्रवारी ही मोठी कारवाई केली आहे. (Latest Marathi News)

Mumbai Crime News
Mumbai Crime : मुंबईत घुसखोरी; ३ बांगलादेशींना अटक, अंधेरी पोलीस-ATS ची कारवाई

'पीटीआय' या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, दहिसर येथे रेस्टोरेंट अँड बारमध्ये अवैधरित्या लेडीज बार सुरू होता. या बारमध्ये बारगर्ल महिलांसाठी विशेष लहान खोल्या बनवल्या होत्या. दहिसर पोलिसांनी (Police) बारमध्ये बारगर्ल महिला नाचताना छापा टाकला. शुक्रवारी टाकलेल्या छाप्यात पोलिसांकडून १९ ग्राहक आणि किचनमध्ये काम करणाऱ्या सहा कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली.

पोलिसांनी सांगितले की, 'आम्हाला चार बारगर्ल नाचताना दिसल्या. बारमध्ये पोलिसांना चकमा देण्यासाठी आणि बारगर्ल महिलांना लपविण्यासाठी छुप्या भूयार तयार करण्यात आले होते.

बारमध्ये छुप्या भूयारात लपविण्यात आलेल्या बारगर्ल महिलांनाही पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपींवर भारतीय दंड संहितेच्या ३०८ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Mumbai Crime News
धक्कादायक! अकोल्यात कोल्ड ड्रिंकमधून दारू पाजून 2 अल्पवयीन मुलींवर सामूहिक अत्याचार

मुंबईमधील फ्रॉड कॉल सेंटर पुणे पोलिसांनी केलं उद्ध्वस्त

ऑनलाईन फ्रॉड आणि फेक कॉल मार्फत फसवणूक झाल्याच्या अनेक तक्रारी गेल्या काही दिवसांत दाखल झाल्या आहेत. त्यामुळे या सर्व चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी पुण्यातील दत्तावाडी पोलीस मुंबईत दाखल झाले. इथे त्यांनी नागरिकांची फसवणूक करणारं एक कॉलसेंटर उद्ध्वस्त केलं आहे. यात ४० मोबाईसह ७ हार्ड डिक्स पोलिसांनी जप्त केल्या आहेत.

बजाज फायनान्स कंपनीच्या नावाने फ्रॉड कॉल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईच्या मुलुंडमध्ये असलेल्या कॉलसेंटरवर धाड टाकण्यात आली आहे. या कॉलसेंटरमध्ये ४३ कर्मचारी कार्यरत होते. सामान्य नागरिकांचे मोबाईल क्रमांक मिळवून त्यावर कॉल केले जात होते. कोणतेही व्याज न आकारता तुम्हाला कर्ज मिळेल अशा ऑफर दिल्या जात होत्या. बजाज फायनान्स कंपनीचे नाव ऐकूण अनेक सामान्या नागरिकांची लुटमार करण्यात आली. अशात आता हे कॉलसेंटर बंदपाडले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com