Pune Crime News  Saam Digital
मुंबई/पुणे

Pune Crime News : 350 किमीचा प्रवास, 600 सीसीटीव्ही फुटेज! येमेन नागरिकांना लुटणाऱ्या गँगला पुणे पोलिसांनी केली अटक

Pune Crime News Update : पोलीस असल्याची बतावणी करून येमेनी नागरिकांना लुटणाऱ्या टोळीला दिल्लीतून अटक करण्यात आली आहे. पुणे पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईची येमेन दुतवासाकडून घेतली असून पोलिसांचं कौतुक केलं आहे.

Sandeep Gawade

अक्षय बडवे

Pune Crime News

पोलीस असल्याची बतावणी करून येमेनी नागरिकांना लुटणाऱ्या टोळीला दिल्लीतून अटक करण्यात आली आहे. पुणे पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईची येमेन दुतवासाकडून घेतली असून पोलिसांचं कौतुक केलं आहे. सिंकदर अली खान, करिम फिरोज खान, इरफान हुसेन हाशमी, मेहबुब अब्दुलहमदी खान अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींकडून ३ हजार अमेरीकन डॉलर, ५०० सौदी रियाल, ५३ हजार रुपयांचे भारतीय चलन व एक गाडी जप्त. सालेह ओथमान एहमद या येमेन नागरिकाने दिलेल्या फिर्यादीरून ही कारवाई करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आखाती देशातून विशेषतः येमेन या देशातून अनेक नागरिक वैद्यकीय उपचार घेण्यासाठी पुण्यात येत असतात. फिर्यादी त्यांच्या पत्नीच्या उपचारासाठी पुण्यात आले होते. 8 फेब्रुवारी रोजी ते कोंढवा परिसरातून जात असताना आरोपी त्यांच्या जवळ आले आणि अरबी भाषेत संवात करून त्यांना पोलीस असल्याचे सांगितले. फिर्यादी यांच्याकडे त्यांनी तुमच्याकडील पत्र, पैसे आणि इतर कागदपत्र विचारले. दरम्यान, आरोपींनी फिर्यादी यांच्याकडील 500 सौदी रियाल, 3 हजार अमेरिकन डॉलर, भारतीय चलनातील 53 हजार रुपये असा मुद्देमाल लंपास करून धूम ठोकली.

याप्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी तब्बल ६०० सी सी टिव्ही फुटेज तपासले तसेच आरोपी ज्या ठिकाणी थांबले होते त्यावर हॉटेल वर छापेमारी करत त्यांचा धागा दिल्ली पर्यंत पोहचल्याचे निष्पन्न झाले. कोंढवा पोलिसांनी दिल्लीत जाऊन या ४ ही आरोपींना ताब्यात घेऊन अटक केली. या कारवाईनंतर येमेन दुतवासाकडून पुणे पोलिसांचे कौतुक केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT