Bhayander News : म्यानमारच्या ८ नागरिकांना उत्तनमधून घेतलं ताब्यात; नेमकं काय आहे प्रकरण? जाणून घ्या

Bhayander News : उत्तन येथे वास्तव्याला असलेल्या म्यानमारच्या आठ नागरिकांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. उत्तन सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही जण बेकायदेशीररित्या वास्तव्य करत असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती.
Bhayandar News
Bhayandar News Saam Digital
Published On

Bhayander News

उत्तन येथे वास्तव्याला असलेल्या म्यानमारच्या आठ नागरिकांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. उत्तन सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही जण बेकायदेशीररित्या वास्तव्य करत असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. त्यानुसार छापा टाकला असता उत्तन येथील चौक जेटी येथे काहीजण घोळक्याने उभे असल्याचे पोलीसांना दिसून आले. पोलीस दिसताच पळून जाण्याच्या तयारीत ते होते. मात्र त्यांना अडवून पोलीसांनी आठ जणांना ताब्यात घेतलं.

त्यांची चौकशी केली असता ते म्यानमारचे नागरिक असून त्यांच्याकडे भारतात रहाण्यासाठी आवश्यक असलेली कोणतीही कागदपत्रे नसल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्या विरुध्द उत्तन सागरी पोलीस ठाण्यात भारतीय पारपत्र अधिनियम व विदेशी नागरीक अधिनियमा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या व्यक्ती उत्तन येथे का आल्या होत्या व त्यांच्या उद्देश काय होता याचा तपास सुरु आहे अशी माहिती पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांनी दिली. गुन्ह्याचा अधिक तपास उत्तन सागरी पोलीस ठाण्याचे उपनिरिक्षक कुणाल कुरेवाड करत आहेत.

Bhayandar News
Bhayandar News : ४० झोपड्या जळून खाक...अनेक संसार उद्ध्वस्त; आझादनगर झोपडपट्टीला लागलेल्या भीषण आगीत एकाचा मृत्यू

आझादनगर झोपडपट्टीला लागलेल्या भीषण आगीत एकाचा मृत्यू

भाईंदर पूर्व येथील आझाद नगर झोपडपट्टीला पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. आगीत दीपक ऊर्फ पपू चौरसिया यांचा मृत्यू झाला तर सहा जण जखमी झाले. जखमींमध्ये दोन लहान मुले व तीन अग्निशमन दलाच्या जवानांचा समावेश आहे. आगीची तीव्रता एवढी होती की निर्माण झालेला धूर एक ते दीड किलोमीटर अंतरापर्यंत पसरला होता. अग्नीशमन दलाने सुमारे तीन तास अथक प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले परंतू परिसरात प्लास्टिक व बांबूची गोदामे असल्याने आग पूर्णपणे विझवण्यास बराच कालावधी लागला.

Bhayandar News
Maharashtra Politics : मनोज जरांगेंना जालन्यातून लोकसभेची उमेदवारी द्या, 'वंचित'चं महाविकास आघाडीला पत्र

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com