Pune: पुण्यात कॅनॉलमध्ये कोसळली रिक्षा, रेस्क्यू ऑपरेशनचा सुरु; चालक बेपत्ता गोपाळ मोटघरे
मुंबई/पुणे

Pune: पुण्यात कॅनॉलमध्ये कोसळली रिक्षा, रेस्क्यू ऑपरेशनचा सुरु; चालक बेपत्ता

पुण्यामध्ये कॅनॉलमध्ये एक रिक्षा पलटी झाली आहे. रिव्हर्स घेत असताना ही धक्कादायक घटना घडली

गोपाळ मोटघरे

पुणे: पुण्यामध्ये कॅनॉलमध्ये (Rickshaw) एक रिक्षा पलटी झाली आहे. रिव्हर्स घेत असताना ही धक्कादायक घटना घडली आहे. जनता वसाहतमधील (Janata Colony) कॅनॉलमध्ये ही रिक्षा पलटी झाली. रिव्हर्स (Reverse) घेत असताना रिक्षा चालकाचा तोल सुटल्याने ही घटना घडली आहे. रिक्षामध्ये असलेला एक व्यक्ती पाण्याच्या प्रवाहामुळे वाहून गेला आहे. स्थानिकांच्या अथक प्रयत्नांनंतर देखील त्या व्यक्तीला वाचवता आले नाही. (Rickshaw crashes into canal in Pune)

हे देखील पहा-

काल रात्री ८ वाजेच्या सुमारास पर्वती पायथ्यालगत असलेल्या जनता वसाहती येथील कॅनॉलमध्ये रिक्षा पलटी झाली आहे. या घटनेमध्ये रिक्षा चालक बेपत्ता झाला असून अग्निशमन दलाकडून (Fire brigade) त्यांचा शोध सुरु आहे. वाहून गेलेला व्यक्ती रिक्षा चालक होता की प्रवाशी (Passengers) याचा तपास सुरु आहे. ही घटना घडताच प्रत्यक्षदर्शींनी अग्निशमन दलाला यासंदर्भातल माहिती दिली आहे.

यानंतर अग्निशमन दलाचे केंद्र प्रमुख प्रमोद सोनवणे, प्रदीप खेडेकर, तांडेल राजाराम केदारी, कोळी, सचिन जवंजाळे, महेंद्र सकपाळ यांनी घटनास्थळी धाव घेऊन सर्च ऑपरेशन राबवले आहे. कॅनॉलजवळच्या रस्त्यावरुन भरधाव वेगाने आलेल्या रिक्षाचालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याची शक्यता अग्निशमन दलाने व्यक्त केली आहे. कॅनॉलजवळ बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. सर्च ऑपरेशन दरम्यान काही अंतरावर रिक्षा सापडली आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bihar Election Result Live Updates : नितीश कुमार की तेजस्वी यादव, बिहारचा कौल कुणाला? लाईव्ह अपडेट एका क्लिकवर

Bihar Election Result: NDA की महाआघाडीला, बिहारमध्ये कोणाची सत्ता बनणार? नितीश कुमार की तेजस्वी यादव कोणाला मिळतेय पसंती, जाणून घ्या

Sidramappa Patil Passes Away : माजी आमदार आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्याचं निधन, ८८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Friday Horoscope : प्रियकराबरोबर बोलताना काळजी घ्याल; या राशींच्या व्यक्तींना दुरावा सहन करावा लागणार

Maharashtra Politics: विदर्भात राजकीय उलथापालथ! भाजपला मोठा धक्का, बड्या नेत्याचा पदाधिकाऱ्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT