Pune suicide case Saam tv
मुंबई/पुणे

पुण्यातील बिल्डरकडून फसवणूक; सेवानिवृत्त अधिकाऱ्याने इमारतीवरून उडी मारून आयुष्य संपवलं

Pune suicide case: पुण्यातील बिल्डरकडून फसवणूक झाल्याचा आरोप करत सेवानिवृत्त अधिकाऱ्याने आयुष्य संपवल्याची घटना घडली आहे. सेवानिवृत्त अधिकाऱ्याच्या आत्महत्येनंतर बाणेरमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

Vishal Gangurde

पुण्यातील बाणेरमध्ये सेवानिवृत्त अधिकाऱ्याची आत्महत्या

बिल्डरने सदनिका न दिल्याचा सेवानिवृत्त अधिकाऱ्याचा आरोप

आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत सगळं सांगितलं

पुण्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. बांधकाम व्यावसायिकाकडून फसवणूक झाल्याने सेवानिवृत्त अधिकार्‍याने पुण्यातील बाणेरमध्ये आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सेवानिवृत्त अधिकाऱ्याच्या आत्महत्येनंतर फसवणूक आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी बिल्डरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यातील बाणेर परिसरात राहणाऱ्या सेवानिवृत्त अधिकाऱ्याने टोकाचं पाऊल उचललं. नरेश उमाकांत महाजन असे आत्महत्या केलेल्या सेवानिवृत्त अधिकाऱ्याचे नाव आहे. महाजन महावितरण कंपनीमधून सेवानिवृत्त झाले होते. महाजन यांनी त्यांची जमीन बिल्डरला विकसित करण्यासाठी दिली होती.

करारानुसार महाजन यांना सदनिका देणे बंधनकारक होते. मात्र या बिल्डरने दिर्घकाळ टाळाटाळ केल्याने महाजन यांना नैराश्य आले. त्यामुळे आत्महत्या करत असल्याचं महाजन यांनी लिहिलेल्या शेवटच्या चिठ्ठीमध्ये म्हटलं आहे. बिल्डरने विकसित करण्यासाठी दिलेल्या जागेवर अर्धवट बांधलेल्या इमारतीच्या सातव्या मजल्यावरुन उडी मारून महाजन यांनी आत्महत्या केली. महाजन यांच्या आत्महत्येनंतर त्यांच्या कुटुंबीयांनी बिल्डरला अटक करण्याची मागणी केली आहे. याबाबत अधिक तपास बाणेर पोलिस करत आहेत.

त्या दिवशी नेमकं काय घडलं?

तत्पूर्वी, महाजन यांनी दिलेल्या जागेवर सात मजली इमारत उभी राहून बांधकाम पूर्णत्वास आलं आहे. महाजन हे १६ फेब्रुवारी रोजी प्रोजेक्टच्या ठिकाणी पोहोचले. त्यानंतर त्यांनी सदनिकेबाबत बिल्डरला विचारणा केली. बिल्डरशी चर्चा करताना त्यांनी धमकी दिल्याचा आरोप आहे. या वादावादीनंतर महाजन यांनी इमारतीवरून उडी घेत आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Price Today : सोन्याचे दर आज कमी झाले की वाढले? पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K,१८K गोल्ड रेट

Navi Mumbai: मुंबई-डोंबिवलीचा प्रवास फक्त १५ मिनिटांत, ऐरोली-काटई उन्नत मार्ग या दिवशी होणार सुरू, वाचा महत्त्वाची अपडेट

Maharashtra News Live Update: सिंहगड किल्ल्यावर दरड कोसळली

Shocking : भयंकर! पतीने फोन चेक केला; पत्नीने छातीवर बसून ओढणीने आवळला गळा, सासूने दार उघडलं अन्...

पुणेकरांची चिंता वाढली! पाऊस सुरू असूनही 'या' धरणांनी तळ गाठला; तुमच्या भागाला पाणी पुरवणाऱ्या धरणाची काय स्थिती?

SCROLL FOR NEXT