अजय दुधाणे, साम टीव्ही
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उल्हासनगरमधील स्मशानभूमीत उभारल्याचा प्रकार समोर आला आहे. स्मशानभूमीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारल्याने आंबेडकरी अनुयायांनी संतप्त भूमिका घेतली आहे. या प्रकारावरून रिपाई नेते श्याम गायकवाड यांनी नाराजी व्यक्त केली आहे. स्मशानातील बाबासाहेबांचा पुतळा न हटवल्यास आंदोलन करण्याचा इशारा रिपाईं नेते श्याम गायकवाड यांनी दिला आहे.
उल्हासनगर शहरातील शांतीनगर स्मशानभूमीत विनापरवाना उभारलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा हटविण्याची मागणी नेते श्याम गायकवाड यांनी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस उपायुक्त यांच्याकडे केली आहे. पुतळा न हटविल्यास जन आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. शासनाने तातडीने पावले न उचल्यास पुतळ्याचा वाद उफाळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
उल्हासनगर कॅम्प नंबर ३ मधील शांतीनगर स्मशानभूमीत विनापरवाना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारल्याचा प्रकार उघड झाला आहे. स्मशानभूमी सारख्या निर्जनस्थळी उभारलेल्या पुतळ्या खाली रात्रीचे खेळ रंगत असल्यचा दावा गायकवाड यांनी केला आहे. त्यामुळे ही डॉ आंबेडकर यांची घोर विटंबना असल्याचे मत रिपाईं, कामगार नेते श्याम गायकवाड यांनी व्यक्त केलं आहे.
'महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, शासकीय कार्यालय, चौक, मैदान, अभ्यासिका या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारणे गरजेचे आहे. परंतु उल्हासनगरात चक्क स्मशानभूमीत पुतळा उभारल्याची घटना देशात पहिली असल्याचं म्हणत गायकवाड यांनी नाराजी व्यक्त केली आहे. उल्हासनगर शहर हे आंबेडकर चळवळीचे केंद्र आहे. या शहरात डॉ आंबेडकर यांची होत असलेली विटंबना कशी काय खपवून घेतली जातेय याबाबतही गायकवाड यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.