Republic Day
Republic Day  Saam TV
मुंबई/पुणे

Republic Day 2023 Updates : देशात 74व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त उत्साहाचं वातावरण

साम टिव्ही ब्युरो

यंदा परेड अर्धा तास उशीराने सुरू होणार

प्रत्येक वर्षी 9:30 वाजता कर्तव्य पथावर परेड सुरु होत असते मात्र, यंदा 10 वाजता परेड सुरु होणार आहे.

'वर्षा' या निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ध्वजावतरण

७४ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त 'वर्षा' या निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ध्वजावतरण करून ध्वजवंदन केले. याप्रसंगी उपस्थित पोलीस बांधवासोबत राष्ट्रध्वजाला सलामी देत वर्षा बंगल्यावर कर्तव्य बजावणाऱ्या समस्त पोलीस बांधवाना त्यांनी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

यासमयी मुख्यमंत्री कार्यालयाचे अप्पर मुख्य सचिव भूषण गगराणी यांच्यासहित मुख्यमंत्री कार्यालयात कार्यरत असणारे सर्व अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

पुण्यात मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण

पुण्यात मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण. पोलिस दल, गृहरक्षक दल, नागरी संरक्षण दल यांचे संचलन.

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे 26 जानेवारी 2023 रोजीचे कार्यक्रम

सकाळी 8.00 वाजता वर्षा निवासस्थानी ध्वजवंदन सकाळी 9.00 वाजता शिवाजी पार्क येथे राज्यपाल महोदयांच्या उपस्थितीत ध्वजवंदन दुपारी 11.00 वाजता लोकशाही न्यूज चॅनलच्या अंधेरी कार्यालयाला वर्धापनदिनानिमित्त भेट दुपारी 1.00 मोटार वाहन निरीक्षक भरती प्रक्रिया 2022 मध्ये नियुक्ती मिळालेल्या उमेदवारांना वर्षा निवासस्थानी नियुक्तीपत्र वाटप संध्याकाळी 5.00 नंतर राज्यपालांनी राजभवन येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त ठेवलेल्या स्वागत समारंभाला उपस्थिती

इजिप्तचे अध्यक्ष यावर्षी प्रजासत्ताक दिनासाठी प्रमुख पाहुणे आहेत

इजिप्तचे अध्यक्ष अब्देल फताह अल सिसी हे यावर्षी प्रजासत्ताक दिनासाठी प्रमुख पाहुणे आहेत

राष्ट्रपती मुर्मू यांच्या हस्ते ध्वजारोहण

सकाळी 10:30 वाजता राष्ट्रपती मुर्मू यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल. परंपरेनुसार प्रथम राष्ट्रध्वज फडकावला जाईल, त्यानंतर राष्ट्रगीत आणि त्यानंतर २१ तोफांची सलामी दिली जाईल.  यानंतर कर्तव्य पथवर परेड सुरू होईल.

Republic Day 2023: देशात आज 74 वा प्रजासत्ताक दिन साजरा होत आहे.प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभर उत्साहाचं वातावरण आहे. 26 जानेवारी 1950 रोजी भारताला सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताक घोषित करण्यात आले. आजच्या दिवशी देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जाणार आहे. गेल्या वर्षी राजपथचे नामकरण 'कर्तव्य पथ' करण्यात आल्यानंतर हा पहिला प्रजासत्ताक दिन सोहळा असेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: मी दिलेलं चॅलेंज स्वीकारलं नाही; श्रीकांत शिंदेंनी आदित्य ठाकरेंना डिवचलं

Who is Shashank Rao: बेस्ट स्ट्राईक, ऑटो युनियनचा झंझावती आवाज शशांक राव आहेत तरी कोण?

Maharashtra Election: राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी येणार एकाच मंचावर? शिवाजी पार्कात होणार सभा

Bihar Wedding Viral News : अजब-गजब प्रेम कहाणी: विधूर जावयासोबत सासऱ्यानेच लावलं बायकोचं लग्न

May Month Horoscope: या राशींसाठी येणारे 30 दिवस ठरतील वरदान, मेष राशीत मंगळाचा प्रवेश ठरणार लाभदायक

SCROLL FOR NEXT