Shruti Vilas Kadam
ओव्हरसाइज्ड ब्लेझर सध्या फॅशनमध्ये खूप ट्रेंडमध्ये आहेत. कॅज्युअल ते फॉर्मल लूकसाठी हे ब्लेझर जीन्स, ट्राउझर्स किंवा ड्रेसेससोबत स्टायलिश दिसतात.
कंबरपर्यंत असलेली क्रॉप्ड जॅकेट्स तरुणींमध्ये लोकप्रिय आहेत. हाय-वेस्ट जीन्स, स्कर्ट किंवा ड्रेसवर ही जॅकेट्स परफेक्ट लूक देतात.
डेनिम जॅकेट हा कधीही आउट ऑफ ट्रेंड न होणारा प्रकार आहे. कॅज्युअल आउटिंगसाठी डेनिम जॅकेट आरामदायक आणि स्टायलिश पर्याय मानला जातो.
बोल्ड आणि क्लासी लूकसाठी लेदर जॅकेट्स सर्वोत्तम ठरतात. हिवाळ्यात तसेच पार्टी किंवा नाईट आउटसाठी हा प्रकार खूप वापरला जातो.
चेक्स पॅटर्न असलेले ब्लेझर ऑफिस आणि कॅज्युअल दोन्ही लूकसाठी ट्रेंडी आहेत. साध्या टॉप किंवा शर्टसोबत हे ब्लेझर उठून दिसतात.
लाँगलाइन ब्लेझर उंच आणि स्लिम लूक देतात. फॉर्मल मीटिंग्सपासून कॅज्युअल स्टाइलिंगपर्यंत हा प्रकार खूप लोकप्रिय आहे.
फ्लोरल, ग्राफिक प्रिंट किंवा एम्ब्रॉइडरी असलेली जॅकेट्स खास प्रसंगांसाठी योग्य ठरतात. या जॅकेट्स लूकमध्ये वेगळेपण आणतात.