Shruti Vilas Kadam
अभिनेत्री जेनेलिया डिसूझा हिने नुकतेच व्हिंटेज स्टाईलमध्ये काही सुंदर फोटो शेअर केले असून, या लूकमध्ये तिचा सौंदर्याचा चार्म अधिक खुलून दिसत आहे.
दोन मुलांची आई असूनही जिनिलियाचा ताजातवाना आणि नैसर्गिक लूक पाहून चाहते थक्क झाले आहेत. तिच्या सौंदर्याचे अनेकांनी मनापासून कौतुक केले आहे.
व्हिंटेज अंदाजातील हे फोटो सोशल मीडियावर शेअर होताच कमी वेळात व्हायरल झाले असून, तिच्या स्टाईलने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
जेनेलिया डिसूझा आणि तिचा पती रितेश देशमुख यांचे प्रेमळ आणि मजबूत नाते चाहत्यांसाठी नेहमीच प्रेरणादायी ठरते आणि यावेळीही त्याची चर्चा रंगताना दिसते.
या व्हिंटेज लूकमधून जिनिलियाचे सौंदर्य आणि व्यक्तिमत्त्व यांचा सुंदर मेळ पाहायला मिळतो, यामुळे ती अधिक एलिगंट आणि आकर्षक दिसते.
फोटोंवर चाहत्यांनी प्रेम, कौतुक आणि सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या असून, अनेकांनी तिच्या लूकला 'क्लासिक' आणि 'ग्रेसेफुल' असे म्हटले आहे.
या फोटो गॅलरीमुळे जिनिलियाचा व्हिंटेज लूक पुन्हा एकदा ट्रेंडमध्ये आला असून, तिची फॅशन सेन्स सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे.