EIGHT BANGLADESHI WOMEN ARRESTED FOR ILLEGAL STAY  Saam tv news
मुंबई/पुणे

Pune Crime: पुण्यातील रेड लाईट एरियात बांगलादेशी महिला; अनधिकृत प्रवेश करत वेश्या व्यवसाय

Red-Light Raid in Pune: पुण्यात बुधवार पेठेतून आठ बांगलादेशी महिलांना बेकायदेशीर वास्तव्य आणि वेश्या व्यवसायात सामील असल्याप्रकरणी अटक करण्यात आली. त्यांनी भारतात अनधिकृत प्रवेश करून बनावट ओळख दिली होती.

Bhagyashree Kamble

सचिन जाधव, साम टीव्ही

पुण्यात बुधवार पेठेत पोलिसांनी कारवाई करत ८ बांगलादेशी महिलांना अटक केली आहे. शहरातील बुधवार पेठेतील रेड लाइट एरियामध्ये या बांगलादेशी महिला अवैधरित्या वास्तव्यास होत्या. या महिलांनी भारतात अनधिकृतपणे प्रवेश केला आहे. तसेच पुण्यात वेश्या व्यवसायात स्वखुशीने सहभाग घेतल्याचे प्राथमिक चौकशीतून उघड झाले आहे. दरम्यान, फरासखाना पोलिसांनी कारवाई करत ८ बांगलादेशी महिलांना ताब्यात घेतलं आहे. सध्या या महिलांची चौकशी सुरू आहे.

गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून कारवाई करत बांगलादेशी महिलांना ताब्यात घेण्यात येत आहे. अशातच फरासखाना पोलिसांना पुण्यातील बुधवार पेठेत अधिकृतरित्या बांगलादेशी महिला वास्तव्यास असल्याची माहिती मिळाली. त्यांनी कारवाई करत ८ संशयित महिलांना ताब्यात घेतलं आहे.

अटक करण्यात आलेल्या महिलांची नावे खालीलप्रमाणे:

अंजुरा बेगम कामरुल चौधरी (वय ४०)

खदीजा बेगम महाबुर शेख (वय २७)

पारोल बेगम मिठु शेख (वय ३८)

तंजीला बेगम अलमगीर काझी (वय ४०)

रूपाली बेगम अकबर शेख (वय ३८)

मन्सुरा रफिक हवालदार अख्तर (वय १९)

सीमा अलमगीर शेख (वय ४५)

रिनाखातून फोजर गाजी (वय ३२)

अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.

पोलिस आयुक्त यांनी अशा बांगलादेशी घुसखोरांवर कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर ही धडक मोहीम हाती घेण्यात आली. फरासखाना ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांनी तपास पथक आणि अँटी-टेररिस्ट सेल यांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली.या कारवाईत पोलिसांनी आठ बांगलादेशी महिलांना ताब्यात घेतले.

चौकशीत त्यांनी बांगलादेशातून बेकायदेशीररीत्या सीमा पार करत भारतात प्रवेश केल्याचे कबूल केले. पुण्यात आल्यावर त्यांनी पश्चिम बंगालमधील रहिवासी असल्याचे खोटे भासवून रेड लाइट एरियामध्ये वेश्या व्यवसाय सुरू केला होता. या प्रकरणी पुढील तपास पोलिसांकडून सुरू असून, संबंधित महिलांवर विदेशी नागरिक कायदा आणि इतर संबंधित कायद्यांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: जामखेली धरण पूर्ण क्षमतेने भरून झाले ओव्हरफ्लो

Nitesh Rane : विषय थेट अंतरपाटापर्यंत गेला, यांच्यामध्ये नवरदेव कोण अन् नवरी कोण? नितेश राणेंचा खोचक सवाल

Thackeray: पुष्पा ते लाडकी बहीण, मुंबईत ठाकरेंची तोफ धडाडली; उद्धव ठाकरेंच्या भाषणातील ठळक मुद्दे

Banana Cake: घरीच झटपट बनवा सॉफ्ट अन् टेस्टी बनाना केक, वाचा सोपी रेसिपी

Upvasachi Kachori: आषाढी एकादशी स्पेशल उपवासाची कचोरी, घरीच फक्त १० बनवा

SCROLL FOR NEXT