Police
Police Saam TV
मुंबई/पुणे

Police Recruitment: पोलीस दलातील 5297 रिक्त पदांची भरती सुरु; गृहमंत्र्यांची माहिती

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रश्मी पुराणिक -

मुंबई : पोलीस दलातील ५२९७ रिक्त पदांच्या पोलीस भरती (Police Recruitment) प्रक्रिया सुरु आहे. काही दिवसात प्रक्रिया पूर्ण होईल आणि आणखी ७२२९ पोलीस भरती होईल अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Home Minister Dilip Walse Patil) यांनी विधानसभेत दिली.

तसंच होमगार्ड ही मोठी ताकद आहे, मात्र त्यांना दिवसभर काम मिळत नाही. त्यांना काम देण्याच्या दृष्टीकोनातून अर्थविभागाकडे प्रस्ताव दिला असून होमगार्डला वर्षभरातून किमान 120 ते 150 दिवस काम देण्यासंदर्भातील निर्णय दिला आहे. यात कोणताही गैरप्रकार होणार नाही काळजी घेणार असून पोलीस विभागात दाखल झालेला पोलीस शिपायाला निवृत्त होताना प्रत्येक हवालदार आणि शिपायी हा पोलीस उपनिरीक्षक झालेला असेल, असा निर्णय घेण्यात आला असल्याचही दिलीप वळसे पाटलांनी सांगितलं.

दरम्यान, राज्यातील पोलीस ठाण्यांच्या इमारती (Police Station Buildings) जुन्या झाल्या आहेत. काही इमारती या ब्रिटीशकालीन आहेत. त्यात सुधारणा करण्याच्या दृष्टीकोणातून गृहनविभागाने निर्णय घेतला असून गेल्या वर्षी 87 पोलीस ठाण्यांची बांधकामं हाती घेतली आहेत. त्यासाठी निधी उपलब्ध करुन दिला आहे. तसेच, निवासासंबंधीही मोठी तरतूद केली असल्याचं त्यांनी सांगितलं.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati lok Sabha : शरद पवारांनी बजावला मतदानाचा हक्क; १० वर्षांनी मुंबई ऐवजी बारामतीत केलं मतदान, Video

Brazil Flood: ब्राझीलमध्ये पावसाचा हाहाकार... ५७ हून अधिक मृत्यू; हजारो नागरिक बेपत्ता

Dharashiv Loksabha Election : रितेश देशमुख आणि जेनिलिया देशमुखने बजावला मतदानाचा हक्क, लातूरमध्ये सहकुटुंब केलं मतदान

नागपूर शहरात सलग तीन दिवस भूकंपाच्या धक्क्याची नोंद, अफवांवर विश्वास ठेवू नका : भूगर्भ वैज्ञानिक सर्वेक्षण विभाग

Raigad Lok Sabha Votting Live: बाळगंगा प्रकल्पग्रस्तांचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार

SCROLL FOR NEXT