saints Viral Video About Eknath Shinde
saints Viral Video About Eknath Shinde Saam Tv
मुंबई/पुणे

Video : "...अशा गद्दारांना पाकिस्तानात पाठवा"; एकनाथ शिंदेंकडे बोट दाखवत संतांनी केली होती भविष्यवाणी?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: कट्टर शिवसैनिक असणारे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडामुळे शिवसेना अक्षरशः ढासळली आहे. महाविकास आघाडी सरकारही कोसळण्याच्या वाटेवर आहे. याबाबत अनेकजण एकनाथ शिंदेंवर टीका करतायत तर काही जण त्यांचं समर्थनही करतायत. या सगळ्यात एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल (Viral Video) होतोय. या व्हिडिओत बंडखोर नेते एकनाथ शिंदे, आदित्य ठाकरे आणि अनेक शिवसेना नेते एका जैन संतांसमोर उभे आहेत. यात जैन संतांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे बोट दाखवत मोठी भविष्यवाणी केली होती असा दावा सोशल मीडियावर करण्यात येत आहे. एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीबाबत संतांनी अगोदरच संकेत दिले होते, पण आदित्य ठाकरे ते संकेत समजू शकले नाही असा दावा या व्हिडिओत करण्यात आला आहे. (Eknath Shinde Viral Video)

हे देखील पाहा -

असा आहे व्हायरल मेसेज

महाराजांनी सांगितलं होत की हिंदूंमध्ये गद्दार आहेत तेव्हा एकनाथ शिंदे ह्यांचा चेहरा व संजय शिरसाट ह्यांचा चेहरा पहा कसा झाला? महाराजांनी हे विधान करताना बोट एकनाथ शिंदे व संजय शिरसाट कडे केले होते, संतांनी ओळखलं आता महाराष्ट्राची जनता सुद्धा ओळखली गद्दार कोण आहे ते!

शिवसेनविरोधात आणि महाविकास आघाडीविरोधात बंड करणारे नेते एकनाथ शिंदे सध्या गुवाहाटीत आहेत. शिवसेनेच्या तब्बल ४० आमदार आणि १० अपक्ष आमदार त्यांच्यासोबत असल्याचा दावा शिंदे गटाकडून करण्यात आला आहे. राज्यातल्या या राजकीय रणधूमाळीत शिवसेनेला सर्वात जास्त हाणी पोहोचल्याचं सध्या दिसतंयं. याच पार्श्वभूमीवर हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एक जैन संत शिवसेना नेत्यांना उपदेश देत आहेत. आदित्य ठाकरेही ते लक्षपूर्वक ऐकतायत, एकनाथ शिंदेही हे समोर उभे आहेत. यात संत म्हणतात की, "मुसलमानांमध्ये एवढे गद्दार नाही जेवढे हिंदुंमध्ये गद्दार आहेत. हिंदुंना धोका हा हिंदुंकडूनच आहे आणखी कुणाकडूनही नाही. आणि अशा हिंदुंना पाकिस्तानात पाठवा." मात्र असं बोलताना जैन संतांनी थेट एकनाथ शिंदेंकडे बोट केलं आहे, ज्यामुळे एकनाथ शिंदे यांचा चेहरा पडला असा दावा व्हायरल व्हिडिओ शेयर करणाऱ्यांकडून करण्यात आला आहे. मात्र, हे संत नक्की कुणाबाबत बोलले याबद्दल स्पष्टता या व्हिडिओतून होत नाही.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati Lok Sabha: सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवारांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून नोटीस, नेमकं कारण काय?

Maharashtra Politics: फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर धैर्यशील मोहिते पाटलांनीही थोपटले दंड; माढ्याच्या मैदानात आरपारची लढाई

Raigad News: ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख अनिल नवगणे यांच्या कारवर हल्ला; आमदार पुत्रासह २५ ते ३० जणांविरोधात गुन्हा

Lok Sabha 2024: काँग्रेसचं ठरलं! राहुल गांधी रायबरेलीतून निवडणूक लढवणार; अमेठीतून तगडा उमेदवार मैदानात!

Horoscope Today : तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय? वाचा आजचे संपूर्ण राशिभविष्य

SCROLL FOR NEXT