RBI Google
मुंबई/पुणे

Pune News : पुण्यातील बँकेवर आरबीआयची मोठी कारवाई, आर्थिक व्यवहारावर निर्बंध, हजारो लोकांना फटका

Pune New India Bank : न्यू इंडिया सहकारी बँकेचे मुंबई पुण्यासह हजारो सभासद आहेत. पुण्याची न्यू इंडिया सहकारी बँकेचे बिबेवाडीमध्ये शाखा आहे. या शाखेमध्ये चौकशी करण्यासाठी सकाळपासून सभासद येत आहेत.

Namdeo Kumbhar

सचिन जाधव

Pune New India Bank RBI News : आरबीआय अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पुण्यातील न्यू इंडिया सहकारी बँकेच्या आर्थिक व्यवहारांवर निर्बंध घातले आहेत. न्यू इंडिया सहकारी बँकेचे मुंबई पुण्यासह हजारो सभासद आहेत. पुण्याची न्यू इंडिया सहकारी बँकेचे बिबेवाडीमध्ये शाखा आहे. या शाखेमध्ये चौकशी करण्यासाठी सकाळपासून सभासद येत आहेत. अनेक सभासद आज सकाळपासून बँकेत आपल्या पैशाची चौकशी करण्यासाठी येत आहेत. आपण बँकेत चौकशी केली आपल्याला व्यवस्थित उत्तर दिली जात नाहीत. आता तीन महिने व्यवहार होणार नाहीत, असं सांगितलं जातं त्यामुळे अनेक सभासद चिंतेत आहेत.

रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी न्यू इंडिया सहकारी बँकेच्या आर्थिक व्यवहारांवर निर्बंध घातले आहेत. न्यू इंडिया सहकारी बँकेचे मुंबई,पुण्यासह आजूबाजूच्या शहरातील हजारो सभासद आहेत. पुण्यात न्यू इंडिया सहकारी बँकेचे बिबेवाडीमध्ये एकमेव शाखा आहे. या शाखेमध्ये अनेक सभासद चौकशी करण्यासाठी सकाळपासून येत आहेत. कोणी उद्योग करून तर कोणी मोलमजुरी करून आपल्या कष्टाचे पैसे न्यू इंडिया सहकारी बँकेत ठेवले आहेत.

आपले पैसे कधी मिळणार असा प्रश्न आता अनेक सभासदांना पडला आहे. त्यातीलच या आहेत जयश्री सौदडे पुण्यातील अप्पर बिबवेवाडी भागात राहतात. घरी मुलगा आणि त्या असे दोघेच असतात. घरून पैसे चोरीला जातात त्यामुळे त्यांनीही पैसे एकत्रित करून बँकेत ठेवले. घरोघरी जाऊन त्या काम करतात. त्यांनीही या न्यू इंडीया को-ऑपरेटिव बँकेत एक लाख रुपये रक्कम ठेवली होती. पण आता बँकेचच भवितव्य अंधारात दिसत आहे.

भिशीचे पैसे घेतले आणि न्यू इंडीया कोऑपरेटिव बँकेत पैसे ठेवले. घर बांधण्यासाठी पैसे जमा केले होते, मात्र आता बँकेच्या व्यवहारावर निर्बंध आल्याने हे पैसे मिळणार नसल्याचे एका महिलेला कळाल्यानंतर त्यानी बँकेत येऊन चौकशी केली. मात्र आता पैसे मिळणार नसल्याने त्याच्या डोळ्यात पाणी आलं. एवढ्या कष्टाने पैसे कमवायचे अन् बँकेत ठेवल्यानंतर बँक आशा बंद होत असतील तर काय करणार? असा प्रश्न त्यांच्यापुढे उपस्थितीत झाला आहे.

पुण्याच्या कोंढवा परिसरात केटरर्सचा व्यवसाय करणाऱ्या कमलेश माळी यानेही बँकेत पैसे जमा केले होते. रोजचे जमा झालेले पैसे गोळा करून न्यू इंडिया को ऑपरेटिव्ह बँकेत ठेवले. रोज व्यवहार करायचे असतात म्हणून साडे चार लाख रुपयांची रक्कम बँकेत ठेवली. मात्र अचानक बँकेने व्यवहार बंद केल्याने आता कामगारांचे पगार कसा करणार? तसेच इतर व्यवहार कसे करणार? असा प्रश्न कमलेश समोर उभा राहिला आहे.

रोजच्या व्यवसायातून येणारे पैसे बँकेत ठेवले होते. मात्र आता बँकेकडून पैसे मिळणार नसल्याचे सांगितल्याने उद्योग व्यवसाय कसा चालवायचा हा ही प्रश्न उभा आहे. कामगारांना रोजच्यारोज पैसे द्यावे लागतात. केटरर्सचा व्यवसाय हा रोजच्या पैशावर चालतो. पुण्यात एकमेव असलेल्या न्यू इंडीया को कॉपरेटिव बँक बिबबेवाडीमध्ये आहे. अशाप्रकारे अनेक सभासदांचे पैसे या बँकेत गुंतल्याने पैसे मिळणार का नाही? असा प्रश्न समोर उभा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : तुमच्याकडे न्याय मिळत नसेल तर गुंडगिरी करू, ठाकरेंचा फडणवीसांना टोला

Garja Maharashtra Maza : ठाकरेंच्या मेळाव्याची गर्जा महाराष्ट्र गीताने सुरूवात | VIDEO

Rava Puri Recipe : टिफीनमध्ये रोज चपाती कशाला? झटपट करा कुरकुरीत बटाटा पुरीचा नाश्ता

विजयी मेळाव्याला या मराठी कलाकारांची हजेरी, Photo पाहा

Marathi Vijay Melava: संपूर्ण लाईट बंद... इकडून उद्धव, तिकडून राज, ठाकरे बंधूंची ग्रँड एंट्रीने वरळी डोम दणाणला|VIDEO

SCROLL FOR NEXT