Raza Academy : "मुस्लिम समाजाला बदनाम करण्याचे काम रझा अकादमी करते" SaamTV
मुंबई/पुणे

Raza Academy : "मुस्लीम समाजाला बदनाम करण्याचे काम रझा अकादमी करते"

मुसलमान समाजाची हे लोक माथी भडकवत आहेत मोर्चा काढण्याचे कारणच सत्य नाही. त्रिपुराच्या डिजिनी तेव्हाच सांगितले हे सत्य नाही. मग राज्यात मोर्चा का काढला गेला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुशांत सावंत -

मुंबई : राज्यात जे काय सुरू आहे आणि महाविकास आघाडीकडून घाणेरडे राजकारण सुरू आहे. ज्यातुन चुकीचा संदेश पसरवले जात आहे. त्याचे मुद्दे मी मांडतो असं म्हणत आज भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी रझा आकादमीवरुन (Raza Academy) राज्य सरकारवरती आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत. '12 तारीखला ज्या घटना झाल्या, मोर्चे निघाले त्याची माहिती समोर ठेवत आहे गृहमंत्री आणि अन्य मंत्र्यांकडून वक्तव्य केले जात आहे. 13 तारीखला अमरावतीमध्ये जे हिंदूंचे मोर्चे निघाली त्यामुळे दंगल झाली असे म्हटले आहे. मात्र 12 तारीखला जो मोर्चा झाला तो रझा अकादमीने काढला होता याची आठवण करुन देत त्यांनी पत्रकार परिषदेची (Press Conference) सुरुवात केली.

हे देखील पहा -

राणे म्हणाले 'मोर्चा काढताना त्रिपुरामध्ये (Tripura) जी घटना घडली त्यासाठी काढण्यात आल्याचे सांगण्यात आले आपण सोशल मीडियाच्या जमान्यात राहतो. रझा अकादमीच्या लोकांनी एक फोटो दाखवावा की त्रिपुरामध्ये हिंदूंनी मस्जिद पाडली. मी त्यांना आव्हान देतो मुसलमान समाजाची हे लोक माथी भडकवत आहेत मोर्चा काढण्याचे कारणच सत्य नाही. त्रिपुराच्या डिजिनी तेव्हाच सांगितले हे सत्य नाही. मग राज्यात मोर्चा का काढला गेला. मोर्चा शांतप्रिय काढायला हवा होता हिंदूंना Hindu का मारलं? याचे उत्तर राज्य सरकार रझा अकादमीला का विचारत नाहीत. रझा अकादमी ही अतिरेकी संघटना आहे हे मी फार जाणीवपूर्वक म्हणतो जशा अतिरेकी संघटना काम करतात तशी ही संघटना काम करत आहे. मुस्लिम समाजाला बदनाम करण्याचे काम ही रझा अकादमी करत आहे.'

तसेच रझा अकादमी आहे त्यांच्या संस्थापक अफगाणिस्तान (Afghanistan) येथे राहतो. मुंबईत मनीष मार्केटमध्ये (Manish Market) यांचे कार्यालय आहे हे लोक काय समाजसेवि काम करतात काय तीन तलाकचा विरोध या रझा आकदमीने केला. यांनी कोरोना लसीकरणाला विरोध केला. फ्रांसच्या राष्ट्रपतीच्या भाषणाला देखील रझा अकादमीने विरोध केला असल्याचे राणे यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान मुंबईमध्ये Mumbai 12 ऑगस्टला या रझा अकादमीने धिंगाणा घातला होता. 1997 मध्ये याच रझा अकादमीने बाळासाहेबांना (Balasaheb Thackeray) विरोध केला होता. त्याच रझा अकादमीचे समर्थन संजय राऊत करतात, त्याच रझा अकादमीच्या व्यासपीठावर अर्जुन खोतकर जातात. या रझा अकादामीवर राज्यात गृहमंत्री काही बोलत नाही. नांदेडमध्ये ही रझा अकादमी काय सत्य नारायण पूजा घालत होती की काय या सरकारला रझा अकादमी काय करते हे दिसत नाही का? असे सवाल देखील राणेंनी यावेळी उपस्थित केले.

UP मध्ये रझा अकादमीने दंगल घडवली नाही का? हे संजय राऊत यांनी थोडं बघावं. राज्यात हिंदूवर जे हल्ले होतात ते सरकारच्या पाठींब्याने होत आहेत का? हे विचारण्याची वेळ आलीय. आज जिथे जिथे दंगल घडलेली आहे तिथे सर्व आमदार काँग्रेस, शिवसेना आणि MIM चे आहेत. देगलूरमध्ये जर भाजपचा आमदार असता तर अशी दंगल घडली नसती असही ते म्हणाले.

भाजप, RSS आणि विश्वहिंदु परिषदेवर दंगल घडवण्याचे आरोप होत आहेत मग राहुल गांधी जे ट्विट करत आहेत त्यांच्यावर का कुणी कारवाई करत नाही. अखिलेश यादव आणि राहुल गांधी गे भडकावू ट्विट करत आहेत. छोट्या यु ट्यूब चॅनलवर छोटे व्हिडिओ करत भडकवण्याचा प्रयत्न रझा अकदामी करत आहेत. राज्यात देखील जळगावमध्ये जे युट्युब चॅनल आहेत तिथे देखील खोटी माहिती पसरवली जात आहेत. या सर्व घटना घडत असताना राज्याचे इंटेलिजन विभाग आणि पोलीस काय करत होते. पोलिसांनी का बघ्याची भूमिका घेतली. वरून काही ऑर्डर होती का? याचे उत्तर राज्य सरकारने द्यायला हवे.

रझा अकदामीला का नाही यांनी सांगितले की राज्यातील कायदा आणि सुव्यस्था खराब करू नका, मला तर वाटत हे महाविकास आघाडीचे षडयंत्र दिसत आहे रझा अकादमीवर बंदी का घातली नाही? रझा अकादमीवर बंदी कधी घालणार ?...याचे उत्तर सरकारने द्यावे हिंदूवरचे अत्याचार आम्ही सहन करणार नाही. अन्यथा परिणाम भोगावे लागतील आम्हाला हिंदू म्हणून रस्त्यावर उतरावे लागेल बाळासाहेबांची शिवसेना Shivsena खऱ्या अर्थाने संपली असल्याचही राणे म्हणाले. तुमच्या वडिलांचा ज्यांनी विरोध केला त्यांना तुम्ही मांडीवर का बसवतात हेच का तुमचे पुत्र प्रेम तुम्हाला राज्यात जातीय दंगली घडवायच्या होत्या का? राज्यात वातावरण खराब करण्याचे काम या सरकारने केल्याचा माझा थेट आरोप आहे अशा पध्दतीचा एक जरी मोर्चा निघाला तरी हिंदूचे मोर्चे निघतील असा इशारा देखील नितेश राणेंनी यावेळी दिला.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: मनसेचा जाहीरनामा प्रसिद्ध

Dharmarakshak Mahaveer Chhatrapati Sambhaji Maharaj : 'आईविना जगण किती अवघडं असतं' धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज ट्रेलर प्रदर्शित

घरबसल्या अनुभवा ॲक्शनचा धमाका; 'Kanguva' आता ओटीटीवर, कधी अन् कुठे पाहाल

Wedding Rituals Varmala Cermony: लग्नात वर-वधूला वरमाला का घालतात? नेमकं कारण काय, जाणून घ्या...

हे आहेत डोके आणि मानेचे प्रमुख कर्करोग, प्रतिबंधासाठी जीवनशैलीत करा हे बदल...

SCROLL FOR NEXT