Ravindra Dhangekar  Saam tv
मुंबई/पुणे

Ravindra Dhangekar News: रविंद्र धंगेकर आज महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या भेटीला; राज ठाकरेंचीही भेट घेणार?

Political news : राज ठाकरे यांचं मुंबईतील निवासस्थान शिवतीर्थावर ही भेट होऊ शकते.

Dnyaneshwar Choutmal

Pune News: कसबा पोटनिवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवणारे महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर आज राज ठाकरे यांची भेट घेण्याची शक्यता आहे. राज ठाकरे यांचं मुंबईतील निवासस्थान शिवतीर्थावर ही भेट होऊ शकते.

कसबा पोटनिवडणुकीतील विजयानंतर रविंद्र धंगेकर सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. रविंद्र धंगेकर यांनी विजयानंतर पुण्याचे खासदार गिरीष बापट, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार तसेच मुक्ता टिळक यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे.

मात्र राज ठाकरे आणि मनसेशी धंगेकरांचं खास नातं आहे. धंगेकर काही काळ मनसेमध्ये सक्रिय होते. कसबा पोटनिवडणुकीत रविंद्र धंगेकरांना मनसेची साथ मिळाल्याची जोरदार चर्चा आहे. त्यामुळे राज ठाकरेंसोबतची त्यांची भेट महत्त्वाची मानली जात आहे. (Political News)

रविंद्र धंगेकर आज मुंबई दौऱ्यावर आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांची ते भेट घेणार आहेत. काँग्रेसचे वरिष्ठ नेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांचीही ते भेट घेतील.

नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर आणि अश्विनी जगताप उद्या 9 मार्च रोजी विधीमंडळ सदस्यत्वाची शपथ घेणार आहेत. शपथविधीनंतर हे दोघेही राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनालाही हजेरी लावणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mula River : पावसाचा जोर ओसरला, धरणातून विसर्ग सुरूच; पवना, मुळा नदीच्या पाणी पातळी वाढण्याची शक्यता

Maharashtra Rain Live News : पुणे जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट

Gauri Kulkarni: पैठणी साडीत गौरी कुलकर्णीचं सुंदर फोटोशूट; PHOTO पाहा

Early signs of cancer: महिलांनी शरीरात होणाऱ्या 'या' 5 बदलांकडे दुर्लक्ष करू नये; कॅन्सरचे प्राथमिक संकेत असू शकतात

GK: 'या' देशात तुरुंगातून पळणे गुन्हा मानले जात नाही, कारण ऐकून तुम्हीही व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT