लखनौ : 'बिग बॉस 16' फेम अर्चना गौतम पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अर्चनाच्या वडिलांनी काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांचे पीए संदीप सिंह यांच्याविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदीप सिंह यांच्याविरोधात मेरठमधील परतापूर पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला आहे.
अर्चनाचे वडील गौतम यांनी आरोप केला आहे की, संदीप सिंह यांनी आपल्या मुलीबाबत जातीवाचक उल्लेख केला, तसेच तिला जीवे मारण्याची धमकीही दिली आहे. मेरठ पोलिसांनी आता याप्रकरणी आयपीसी कलम ५०४, ५०६ आणि एससी एसटी कायद्यानुसार गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
गौतम यांनी सांगितलं की, अर्चना बऱ्याच दिवसांपासून प्रियंका गांधी वाड्रा यांना भेटण्याचा प्रयत्न करत होती. पण संदीप सिंह त्यांना भेटू देत नाहीत. अर्चनाला २६ फेब्रुवारीला प्रियांका गांधी यांच्या निमंत्रणावरून काँग्रेस महाअधिवेशनात सहभागी होण्यासाठी संदीप सिंह यांनी रायपूर छत्तीसगडला बोलावले होते. अर्चनाने प्रियंका गांधी यांच्या भेटीची वेळ मागितली, पण पीए संदीप सिंग यांनी नकार दिला.
अर्चनाच्या वडिलांचा आरोप आहे की संदीप सिंह यांनी आपल्या मुलीसोबत गैरवर्तन केले. त्यांनी धमकी देत जातीवाचक शब्दही उच्चालले. त्यानंतर अर्चनाच्या वडिलांनी संदीप सिंग विरोधात तक्रार दाखल केली आहे.
याबाबत अर्चनाने म्हटलं की, संदीप यांनी तिला तुरुंगात टाकण्याची धमकीही दिली होती. अर्चनाच्या वडिलांनीही मुलीच्या जीवाला धोका असल्याचे सांगत सुरक्षेची मागणी देखील केली. (Latest News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.