Ravindra dhangekar Saam v
मुंबई/पुणे

Maharashtra Politics : आगामी काळात एकनाथ शिंदेंही ठाकरेंसोबत जातील; पुण्यातील बड्या नेत्याचा दावा

Ravindra dhangekar on Eknath shinde :आगामी काळात एकनाथ शिंदेंही ठाकरेंसोबत जातील, असा दावा रविंद्र धंगेकर यांनी केलाय. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Vishal Gangurde

मराठी मुद्द्यांसाठी दोन्ही बंधू एकत्र आले. राजकारणात काही होऊ शकतं. आगामी काळात एकनाथ शिंदे देखील ठाकरे यांच्यासोबत जातील, असा दावा पुण्यातील माजी आमदार शिंदे गटाचे नेते रविंद्र धंगेकर यांनी केला आहे. रविंद्र धंगेकर यांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

मराठी भाषेच्या मुद्यावरून ठाकरे बंधू एकवटले. मुंबईतील विजयी मेळाव्यात ठाकरे बंधूंनी सरकारवर जोरदार निशाणा साधला. दोन्ही ठाकरे एकत्र आल्याने राज्यातील राजकीय समीकरण बदललं आहे. त्यामुळे येत्या महापालिका निवडणुकीत त्याचा परिणाम पाहायला मिळणार आहे. दोन्ही बंधू एकत्र येण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु असताना, काँग्रेसमधून शिंदे गटात गेलेल्या रविंद्र धंगेकर यांनी एका वृत्त वाहिनीशी बोलताना मोठा राजकीय दावा केला.

रविंद्र धंगेकर नेमकं काय म्हणाले?

रविंद्र धंगेकर म्हणाले, 'राज आणि उद्धव ठाकरे यांची रक्ताची नाती आहेत. रक्ताची नाती एकत्र आली. दोन भाऊ एकत्र आल्याचं सर्वांना आवडलं. मलाही आवडलं. दोन्ही एकत्र भाऊ एकत्र आल्याने कोणाला वाईट वाटेल. मराठी माणसे एकत्र येत आहेत'.

'आजच्या मेळाव्याला राजकीय भूमिका नव्हती. आज फक्त मराठी माणसाची भूमिका होती. मराठी माणसासाठी एकत्र येण्याच्या भूमिकेचं स्वागत केलं पाहिजे. अनेकांनी त्यांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न केले. भविष्यात एकनाथ शिंदेही एकत्र येऊ शकतात. राजकारणात काहीही होऊ शकतात, असे ते पुढे म्हणाले.

रविंद्र धंगेकर यांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे. धंगेकर यांच्या दाव्याने अनेक राजकीय नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. धंगेकर यांच्या दाव्यानंतर ठाकरे गट आणि मनसेकडून काय प्रतिक्रिया दिली जाते, हे पाहावे लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

HBD Ranveer Singh : बॉलिवूडचा बाजीराव किती कोटींचा मालक?

Ashadhi Ekadashi Marathi Wishes: पाऊले चालती पंढरीची वाट...आषाढी एकादशी निमित्ताने प्रियजनांना पाठवा 'हे' खास शुभेच्छा

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आज येलो अलर्ट जारी

Prataprao Jadhav : मुंबई गुजरातची राजधानी होती, शिंदे सेनेच्या प्रतापराव जाधवांचे वक्तव्य

Politics: 'छत्रपती संभाजी राजेंनी १६ भाषा शिकल्या, ते काय मु**'; शिंदे गटातील आमदाराची जीभ घसरली

SCROLL FOR NEXT