BJP State President Ravindra Chavan Saam Tv News
मुंबई/पुणे

Maharashtra Politics : भाजपचे नवीन प्रदेशाध्यक्ष कोण? बड्या नेत्याचं नाव पक्कं; उद्या अधिकृत घोषणा होणार

BJP New State President Ravindra Chavan : भाजप लवकरच आपला नवीन प्रदेशाध्यक्ष जाहीर करणार आहे. यासाठी रवींद्र चव्हाण यांनी अर्ज दाखल केला आहे. अर्ज दाखल करत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रेशेखर बावनकुळे यांच्यासह राज्यातील प्रमुख नेते उपस्थित होते.

Prashant Patil

मुंबई : भाजप लवकरच आपला नवीन प्रदेशाध्यक्ष जाहीर करणार आहे. यासाठी रवींद्र चव्हाण यांनी अर्ज दाखल केला आहे. अर्ज दाखल करत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रेशेखर बावनकुळे यांच्यासह राज्यातील प्रमुख नेते उपस्थित होते. आता उद्या संध्याकाळी भाजपच्या नवीन प्रदेशाध्यक्षांच्या नावाची अधिकृत घोषणा होणार असल्याचंही भाजपने सांगितलं आहे.

देवेंद्र फडणवीस म्हटले की, 'राज्याच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी निवडणूक सुरु झाली आहे. यासाठी केंद्रीय मंत्री किरण रिजिजू आले आहेत. त्यांच्यासमोर आम्ही रविंद्र चव्हाण यांचा प्रदेशाध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला आहे. जे यापूर्वी मंत्री होते, त्यांनी युवा मोर्चाचा कार्यकर्ता म्हणून कामाला सुरुवात केली होती, त्यानंतर ते नगरसेवक झाले, नंतर आमदार झाले. आज प्रदेशाध्यक्षरदासाठी आम्ही त्यांचा अर्ज दाखल केला आहे'.

‘मागच्या काळात चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रदेशाध्यक्ष म्हणून अतिशय चांगलं काम केलं. त्यांनी चांगल्या प्रकारे संघटना बांधली, याचा परिणाम विधानसभा निवडणूकीत दिसून आला. त्यानंतर रविंद्र चव्हाण यांची कार्याध्यक्ष म्हणून काम केलं. आज आम्ही त्यांचा अर्ज दाखल केला आहे. उद्या संध्याकाळी त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा होईल’. असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

पश्चिम महाराष्ट्राचे राजकारण बदलणार

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक नेत्यांनी मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. काही महिन्यांत या निवडणुका पार पडणार असून, सध्या मोठ्या प्रमाणात राजकीय उलथापालथ पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरेंना मोठे राजकीय धक्के सहन करावे लागले आहेत. अशातच पश्चिम महाराष्ट्रातही उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. कोल्हापुरात शिवसेनेचे उपनेते संजय पवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून, नाराजीही व्यक्त केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune : जिवाभावाचा मित्र वाढदिवसाला आलाच नाही, संतापलेल्या दोस्तांनी २५ वाहनांची केली तोडफोड

Friday Horoscope : जवळच्या लोकांकडून वाहवाह होईल, प्रगती घडेल; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात चमत्कार घडणार

Red Alert in Maharashtra : पाऊस आज कहर करणार, ७ जिल्ह्यांना रेड अलर्ट, IMD च्या इशाऱ्यानंतर २ जिल्ह्यातील शाळा-कॉलेज बंद

Shukrwar che Upay: शुक्रवारच्या 'या' उपायांनी भाग्याचे दरवाजे उघडतील; घरात सुख-समृद्धी सोबत पैसाही येईल

Todays Horoscope: 'या' राशींच्या व्यक्तींना आज जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी; जाणून घ्या राशीभविष्य

SCROLL FOR NEXT