Shivsena: कोल्हापूरच्या हुकमी एक्क्याने ठाकरेंची साथ सोडली, पश्चिम महाराष्ट्राचे राजकारण बदलणार

Sanjay pawar Resigns Shivsena: शिवसेनेचे उपनेते संजय पवार यांनी कोल्हापुरात आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. जिल्हा निवड प्रक्रियेतील नाराजीमुळे त्यांनी हे पाऊल उचलले असून पक्षात खळबळ उडाली आहे.
Sanjay Pawar Resigns Shivsena
Sanjay Pawar Resigns ShivsenaSaam tv news
Published On

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक नेत्यांनी मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. काही महिन्यांत या निवडणुका पार पडणार असून, सध्या मोठ्या प्रमाणात राजकीय उलथापालथ पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरेंना मोठे राजकीय धक्के सहन करावे लागले आहेत. अशातच पश्चिम महाराष्ट्रातही उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. कोल्हापुरात शिवसेनेचे उपनेते संजय पवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून, नाराजीही व्यक्त केली.

शिवसेनेमध्ये अस्तित्वाचा संघर्ष तीव्र होण्याच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरमधील पदाधिकाऱ्यांच्या नाराजीनाट्यामुळे परिस्थिती बिघडत चालली आहे. २०२२ साली राज्यसभा निवडणुकीसाठी संजय पवार यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली होती. संभाजी राजे यांच्याविरोधात त्यांना उमेदवारी देण्यात आली होती. तेव्हाच शिवसेना फुटली. त्यानंतर आता संजय पवार यांनी देखील ठाकरेंच्या शिवसेनेला रामराम ठोकला आहे. त्यांनी थेट आपल्या उपनेतेपदाचा राजीनामा दिला आहे.

यादरम्यान, संजय पवार यांनी आपली नाराजी उघड बोलून दाखवली. इंगवले यांच्या नियुक्तीवर नाराज असून, 'इथून पुढेही उद्धव ठाकरेंचा शिवसैनिक म्हणून काम करीत राहीन' असं त्यांनी म्हटलं आहे. पवार यांनी राजीनामा देताना आपली खदखद व्यक्त केली. 'शिवसेनेमध्ये उपनेते हे तिसऱ्या क्रमाकांचे पद आहे, असतानाही कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिवसेनेच्या जिल्हा पातळीवरील निवड प्रक्रियेत आपल्याला कुठल्याही पद्धतीची माहिती देण्यात आली नसल्याचं पवार म्हणाले.

Sanjay Pawar Resigns Shivsena
Beed: 'तुमचा मुलगा कुठेय?' ३० ते ४० जणांच्या टोळक्यानं बीडच्या कुटुंबाला धमकावलं; दगड अन् चाकूने प्राणघातक हल्ला

तसेच 'निवड झाल्यानंतर विचारणा करण्यात आली नाही. त्यामुळे या पद्धतीवर तीव्र नाराज असून, उपनेतेपदाचा राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं', असं पवार म्हणाले. त्यांनी हेही स्पष्ट केलं की, 'जर मी उपनेता पदावर असून, शिवसैनिकांना न्याय देऊ शकत नसलो, तर या पदाचा मला काहीही उपयोग नाही, मी जरी उपनेतेपदाचा राजीनामा दिला असला, तरी शेवटच्या श्वासापर्यंत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत राहणार आहे, असं संजय पवार म्हणालेत.

दरम्यान, शिवसेनेचे सह संपर्कप्रमुख विजय देवणे यांनी विश्वास व्यक्त करत सांगितलं की, 'संजय पवार यांनी जरी उपनेते पदाचा राजीनामा दिला असला, तरी ते दोन दिवसांत राजीनामा माघार घेतील आणि पुन्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात सक्रिय होतील. पक्षाने घेतलेल्या निर्णयांवर सध्या संजय पवार नाराज आहेत. पण त्यांनी आपला राजीनामा मागे घ्यावा यासाठी मी त्यांना विनंती केली असल्याचं देवणे म्हणालेत.

Sanjay Pawar Resigns Shivsena
Shocking: शारीरिक संबंध ठेवताना पतीकडून व्हिडिओ रेकॉर्ड करण्याची मागणी; पत्नीचा नकार, मानेवर पाय ठेवून जागीच संपवलं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com