palghar citizens morcha on thursday at azad maidan mumbai to oppose vadhavan port project
palghar citizens morcha on thursday at azad maidan mumbai to oppose vadhavan port project saam tv
मुंबई/पुणे

Palghar : वाढवण बंदर विरोधात गुरुवारी चाराेटीत आंदाेलन, संघर्ष समिती राेखणार मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग

रुपेश पाटील

Palghar News :

पालघर जिल्ह्यातील हाेऊ घातलेल्या वाढवण बंदर (Vadhavan Port) विरोधात पालघर मधील 25 पेक्षा अधिक संघटना येत्या 22 फेब्रुवारीला आझाद मैदानावर आक्रोश मोर्चा काढण्याचा निर्धार व्यक्त केला हाेता. आता त्याच दिवशी चारोटी येथे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग (mumbai ahmedabad national highway) रोखण्यात येणार असल्याचे बंदर विरोधी युवा संघर्ष समितीचे अध्यक्ष मिलिंद राऊत (milind raut) यांनी साम टीव्हीशी बाेलताना दिली. (Maharashtra News)

केंद्र सरकारच्या महत्त्वाकांशी वाढवण बंदराच्या सर्व मान्यता प्राप्त झाल्या असून याच महिन्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाढवण बंदराचे भूमिपूजन होणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले.

त्यानंतर वाढवण बंदर विरोधी संघर्ष समिती, वाढवण बंदर विरोधी युवा संघर्ष समिती , महाराष्ट्र मच्छिमार कृती समिती, नॅशनल फिश वर्क फोरम, ठाणे जिल्हा मध्यवर्ती समाज संघ, ठाणे जिल्हा मच्छीमार समाज संघ, अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समिती, समुद्र बचाव मंच, समुद्रकन्या मंच सातपाटी, कष्टकरी संघटना, भूमी सेना व आदिवासी एकता परिषद व इतर समस्त बंदर विरोधी संघटना यांनी या बंदराला तीव्र विरोध दर्शवला आहे.

येत्या 22 फेब्रुवारी रोजी चारोटी येथे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग रोखण्यात येणार असल्याचे बंदर विरोधी युवा संघर्ष समितीचे अध्यक्ष मिलिंद राऊत यांनी सांगितले. तसेच 25 तारखेला पश्चिम किनारपट्टीवरील सर्व भूमिपुत्र हे किनाऱ्यावर एकत्र येत मानवी साखळी करून काळे झेंडे दाखवून निषेध नोंदवणार आहेत. त्यामुळे वाढवण बंदराचा संघर्ष हा अधिकच तीव्र होताना दिसून येत आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

तुळजापूर: देवीच्या सोने-चांदी अपहार प्रकरणी दोषींवर तात्काळ गुन्हे दाखल करा, अन्यथा अवमान याचिका दाखल करणार : हिंदु जनजागृती समिती

Pimpri Chinchwad Hoarding Collapsed: पिंपरी-चिंचवड होर्डिंग कोसळ्याप्रकरणी कारवाई, मालक आणि स्ट्रक्चर ऑडिट करणाऱ्यांविरोधात गुन्हा

Married Before 30 Years : तिशीच्या आत लग्न न केल्यास येतील 'या' अडचणी

Parenting Tips: मुलांना मानसिकदृष्ट्या मजबूत बनवायच आहे? तर या गोष्टी नक्की शिकवा

Ayodhya Poul: ठाकरे गटाच्या नेत्या अयोध्या पौळ यांना मारहाण; महिलेनं हिसकावला मोबाईल

SCROLL FOR NEXT