Baramati Saam Tv
मुंबई/पुणे

Baramati : निमगाव केतकीत शेतकऱ्यांचा रास्ता रोको; इंदापूर - बारामती महामार्गाची वाहतुक खाेळंबली

यावेळी सर्व राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी या कालवा अस्तीकरणासाठी केलेल्या रास्ता रोकोला पाठिंबा दिला.

मंगेश कचरे

Baramati : निरा डावा कालव्याच्या क्रॉंक्ट्रीकरणाच्या अस्तरीकरणाच्या विरोधात शेतक-यांनी (farmers) निमगाव केतकीत रास्ता रोको (rasta roko) आंदाेलन केले. यामुळं इंदापूर - बारामती राज्य महामार्गावरील (indapur baramati highway) वाहतुक सुमारे अर्धा तास खाेळंबली हाेती. या मार्गावर वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्याने वाहनधारकांना नेमकं काय झालं हे समजत नव्हतं. आंदाेलन मागे घेतल्यानंतर महामार्गावरील वाहतुक सुरळीत झाली. (Breaking Marathi News)

नीरा डावा कालवा क्रॉंक्ट्रीकरणाच्या अस्तरीकरणाच्या आदेशाला शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवण्यासाठी आज (गुरुवार) पुणे (Pune) जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथे इंदापूर - बारामती राज्य महामार्ग सुमारे अर्धा तासाहुन अधिक काळ रोखुन धरत निषेध व्यक्त केला. यावेळी सर्व राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी या कालवा अस्तीकरणासाठी केलेल्या रास्ता रोकोला पाठिंबा दिला. (Baramati Latest Marathi News)

अस्तरीकरणामुळे फक्त शेतकऱ्यांचाच तोटा होणार नाही तर कालव्याच्या परिसरातील जैवविविधता देखील धोक्यात येणार आहे. पर्यावरणाची फार मोठी हानी होणार आहे. त्यामुळे शासनाने त्यांचा निर्णय रद्द करावा अशी मागणी शेतक-यांनी केली.

या रास्ता रोको दरम्यान दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. हे काम बंद केले नाही तर मोठे आंदोलन छेडू असा इशारा आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी दिला. आजचे आंदाेलन मागे घेतल्यानंतर इंदापूर बारामती राज्य मार्गावरील वाहतुक सुरळीत झाली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मंगळवेढा नगराध्यक्ष पदाच्या निवडणूकीला स्थगिती ,जिल्हाधिकारी यांची माहिती

Malaika Arora: मलायका अरोरा ज्याच्या प्रेमात पडली; तो हर्ष मेहता आहे कोण?

Accident: महामार्गावर अपघताचा थरार! भरधाव टेम्पो अन् कारची समोरासमोर धडक; ६ जणांचा जागीच मृत्यू

पुण्यातील बुधवार पेठेत भयंकर घडलं; चिठ्ठी लिहून तरूणीनं ९व्या मजल्यावरून उडी घेतली, आत्महत्या करण्यामागचं कारण काय?

Medical Education Scam : मेडिकल शिक्षण क्षेत्राला हादरवणारा घोटाळा, महाराष्ट्रासह 10 राज्यांमध्ये कॉलेजांवर धाड

SCROLL FOR NEXT