Andheri East Bypoll Election 2022 : भाजपचं असं वागणं नवं नाही : सतेज पाटील

माजी गृहराज्य मंत्री सतेज पाटील हे सिंधुदुर्ग जिल्हा दाै-यावर आले आहेत.
Satej Patil , Andheri East assembly by- elections, sindhudurg
Satej Patil , Andheri East assembly by- elections, sindhudurgsaam tv
Published On

- विनायक वंजारे

Satej Patil : अंधेरी पूर्व पोटनिवडणूकीवरुन (andheri assembly east by election) सुरु असलेले राजकारण हे दुर्देवी आहे असं मत काॅंग्रेस नेते आमदार सतेज पाटील (satej patil) यांनी सिंधुदुर्ग (sindhudurg) येथे व्यक्त केले. भाजपनं ही निवडणुक बिनविराेध करणं गरजेचे हाेते असेही पाटील यांनी नमूद केले. (Breaking Marathi News)

आमदार सतेज पाटील हे आज सिंधुदुर्ग दाै-यावर आले आहेत. अंधेरी पुर्व पोट निवडणुक लढविण्यासाठी ऋतुजा लटके (Rutuja Latke) या इच्छुक आहेत. परंतु त्यांच्या राजीनाम्यावरुन सध्या भाजपा खालच्या पातळीचं राजकारण करीत आहे असे आमदार पाटील यांनी नमूद केले. ते म्हणाले खरं तर ही निवडणूक सहानुभूती आणि माणुसकी दाखवून बिनविरोध करणे गरजेचे होते. काेल्हापूर, नांदेड या पाेट निवडणुकीत देखील त्यांनी उमेदवार दिला हाेता. केवळ सत्ता मिळवणे हा एकमेव उपक्रम भाजपाचा आहे अशी टीका देखील त्यांनी केली. (Satej Patil Latest Marathi News)

Satej Patil , Andheri East assembly by- elections, sindhudurg
Andheri East Bypoll Election 2022 : 'कशाला चिंता करायची, उद्धव ठाकरे संपलेला माणूस आहे'

दरम्यान आमदार सतेज पाटील यांनी असलं राजकारण महाराष्ट्रात चालत नाही. हे येत्या निवडणुकीत मतदार दाखवून देतील असेही नमूद केले. ते म्हणाले आगामी सर्व निवडणुका महाविकास आघाडी मार्फत लढवाव्यात अशी लोक भावना आहे. त्यानुसार आघाडी मार्फत निवडणुका व्हाव्यात असे माझेही वैयक्तीक मत असल्याचे सतेज पाटील यांनी सांगितले. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

Satej Patil , Andheri East assembly by- elections, sindhudurg
Breaking News : बाळासाहेबांची शिवसेना गटाच्या आमदारानं पीक विमा कार्यालय फाेडलं; शेकडाे कार्यकर्ते दाखल

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com