Rashmi Thackeray  saam tv
मुंबई/पुणे

Maharahstra Politics: रश्मी ठाकरे भावी मुख्यमंत्री; मातोश्रीच्या परिसराबाहेरील बॅनरमुळे चर्चांना उधाण

Rashmi Thackeray : मविआमध्ये मुख्यमंत्री कोण होणार हा चेहरा अद्याप ठरलेला नसला तरी ठाकरे गटाकडून उद्धव ठाकरे यांच्या नावाचा आग्रह धरला जात आहे.

Bharat Jadhav

महायुती असो किंवा मग महाविकास आघाडी असो या दोघांमध्ये ही मुख्यमंत्री पदांबाबत रस्सीखेच आपल्याला पाहायला मिळत आहे. यातचं आता मातोश्री परिसराबाहेर रश्मी ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्ताने शुभेच्छांचे बॅनर लागले आहेत. त्या बॅनर वरती पुढचा मुख्यमंत्री रश्मी ठाकरे अशा आशयचा उल्लेख आहे.

पुढील काही दिवसात आचारसंहिता लागणार आहे. त्याआधी महायुती आणि महाविकास आघाजीमध्ये जागावाटपाटच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. महाराष्ट्राचा पुढील मुख्यमंत्री कोण असेल? याबाबतच्या चर्चेनं जोर धरला आहे. याच दरम्यान मातोश्रीच्या परिसरात उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचे बॅनर लागलेत. या बॅनरवर त्यांचा भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख करण्यात आलाय. हे बॅनर त्यांच्या वाढदिवसानिमित्त लावण्यात आले आहे.

मविआमधील अनेक नेत्यांनी मुख्यमंत्रीपदावरती दावे सांगितलेले आहेत. काही दिवसांपूर्वी बारामती मध्ये देखील सुप्रिया सुळे भावी मुख्यमंत्री अशा आशयाचे बॅनर लागले होते. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी देखील भर सभेतून मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करा अशी भूमिका मविआ नेत्यांसमोर मांडली होती. आता अशातच पुन्हा एकदा मातोश्री परिसराबाहेर रश्मी ठाकरे पुढचा मुख्यमंत्री अश्या आशयाचे बॅनर लागल्यानंतर, महाविकास आघाडीमध्ये याचे पडसाद काय उमटतील हे पाहणं महत्त्वाचं आहे.

दरम्यान, राज्यातील राजकारणात जेव्हा कधी महिला मुख्यमंत्र्याची चर्चा सुरू होते त्यावेळी रश्मी ठाकरे यांचे नाव समोर येत असतं. काही दिवसापूर्वी काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनीही रश्मी ठाकरेही मुख्यमंत्रिपदासाठी दावेदार असल्याचं म्हटलं होतं. मात्र खासदार गायकवाड यांनी केलेल्या विधानावर ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी नाराज व्यक्त केली होती.

कारण नसताना रश्मी वहिनींचं नाव कशाला घेता? असं म्हणत किशोरी पेडणेकर यांनी वर्षा गायकवाड यांना सुनावलं होतं. रश्मी ठाकरे या कधीही थेट राजकारणात आल्या नाहीत. त्या उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या असतात. त्या मुख्यमंत्री व्हायला पाहिजे पण कारण नसताना त्यांचं नाव यायला कामा नये, असं पेडणेकर म्हणाल्या होत्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CM Fadnavis: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; याचिकेतून विधानसभा निवडणुकीतील विजयाला दिलं होतं आव्हान

Maharashtra Live News Update: धाराशिवात १७ मुलींना झाली विषबाधा

The Hunt: माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येवर आधारित 'द हंट' ही मालिका तुम्ही कधी आणि कुठे पाहू शकता?

Apoorva Nemalekar : “प्रवास सोप्पा नव्हता...'' मालिकेला निरोप देताना अपूर्वाची भावूक पोस्ट व्हायरल

Rupali Bhosle: 'रूप तेरा मस्ताना' रूपाली भोसलेचे फोटो पाहून तुम्हीही हेच म्हणाल...

SCROLL FOR NEXT