Raosaheb Danve News Saam tv
मुंबई/पुणे

Raosaheb Danve News: राहुल गांधींचं लग्न लावण्यासाठी पुढची बैठक शिमल्यात होणार आहे का? विरोधकांच्या बैठकीवर दानवेंची मिश्किल टिप्पणी

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी राहुल गांधींचं लग्न लावण्यासाठी पुढची बैठक शिमल्यात होणार आहे का? असा सवाल करत मिश्किल टिप्पणी केली.

रोहिदास गाडगे

Raosaheb Danve News: आगामी काळात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १७ विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्यांची बैठक काल पाटण्यात पार पडली. तर विरोधकांची पुढची बैठक शिमल्यात होणार आहे. पाटण्याच्या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सत्ताधारी भाजपवर सडकून टीका केली.

या पत्रकार परिषदेत बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यांनी काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांना लग्न करण्याचा सल्ला दिला. यावरून केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी राहुल गांधींचं लग्न लावण्यासाठी पुढची बैठक शिमल्यात होणार आहे का? असा सवाल करत मिश्किल टिप्पणी केली. (Latest Marathi News)

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे हे सध्या पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. आगामी काळात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिरूर लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी आज आळंदीमध्ये भाजपचे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आलं होतं.

यावेळी रावसाहेब दानवे यांनी आपल्या खास शैलीत विरोधकांवर चौफेर टीका केली. '2024 मध्ये देशात पुन्हा एकदा भाजपची सत्ता येईल आणि पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी हेच असतील, असा विश्वास दानवेंनी व्यक्त केला.

'मोदींची लोकप्रियता एवढी वाढली की बाहेरील देशाचे पंतप्रधान मोदींचं दर्शन घेतात. त्यांचे पाय धरतात. मोदींची ही लोकप्रियता केवळ भारतीयांनी त्यांच्यावर केलेल्या प्रेमाची आहे . जगावर जेव्हा कोरोनाचं संकट आलं, तेव्हा मोदी यांनीच कोरोनावरची लस शोधल्याचा दावा देखील दानवे यांनी केला

दरम्यान, यावेळी उपस्थित लोकांचं लक्ष वेधण्यासाठी आपल्या खास भाषण शैलीसाठी प्रसिद्ध असलेल्या दानवे यांनी अंड देणाऱ्या कोंबड्याचा किस्सा सांगितला. तेव्हा सभागृहात एकच हशा पिकला. तर पुढे त्यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेत आम्हाला जातीयवादी म्हणणारे शरद पवार , मायावती, उमर अब्दुल्ला, नितीश कुमार , ममता बॅनर्जी या सर्व नेत्यांचे 15 पक्ष आमच्या पंगतीत जेवलेले आहेत. त्यांचे तोंड खरकटे आहेत, अशी खरमारीत टीका देखील त्यांनी केली.

'विरोधकांनी पाटण्यात घेतलेली बैठक ही राहुल गांधींचं लग्न जमवण्यासाठी होती, तर पुढची शिमल्यात होणारी बैठक त्यांचे लग्न लावण्यासाठी होणार आहे का, असा सवाल करत केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी कालच्या लालू प्रसाद यांच्या वक्तव्यावर मिश्किल टिप्पणी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

धमकीनंतरही बिग बींचा रविवारचा नियम कायम; चाहत्यांना भेटण्यासाठी शोधली भन्नाट शक्कल

Vastu Tips For Wall Clock: घरात घड्याळ कुठे लावावे? वास्तुशास्त्रानुसार योग्य दिशा कोणती?

Stylish Tops For Women: जीन्सवर कोणत्या प्रकारचे टॉप्स घालावेत? पाहा लेटेस्ट कलेक्शन

Jalgaon Firing: दुचाकीवरून आलेल्या तीन हल्लेखोरांकडून 25 वर्षीय तरुणावर बेछुट गोळीबार, भुसावळ हादरलं!

Co-Ords Sets Dress For Women: दिवाळीनिमित्त महिलांसाठी को-ऑर्ड सेट ड्रेसचे लेटेस्ट 5 पॅटर्न्स

SCROLL FOR NEXT