राज ठाकरेंच्या नावाने मागितली खंडणी; बॉलीवूडमधील तिघेजण गजाआड  Saam Tv
मुंबई/पुणे

राज ठाकरेंच्या नावाने मागितली खंडणी; बॉलीवूडमधील तिघेजण गजाआड

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या नावावर खंडणी मागण्याचा अघोरी प्रकार समोर आला

सुरज सावंत

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या नावावर खंडणी मागण्याचा अघोरी प्रकार समोर आला आहे. याबाबत एक व्हिडीओ देखील सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. राज ठाकरेंचे नाव घेत एका सुरक्षा रक्षकाला दमदाटी करतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. या प्रकरणी आता तिघांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

तू राज ठाकरेंना ओळखत नाहीस? काम कोणासाठी करतोय? महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये राहतोय ना तू? असे ओरडत, एका सुरक्षा रक्षकाला मारहाण करत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या नावाने खंडणी मागितल्याचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे. याच प्रकरणी सध्या मुंबई मधील मालवणी पोलीसांकडून सिनेसृष्टीतील तिघांना बेड्या ठोकण्यात आले आहेत.

हे देखील पहा-

यामध्ये दिग्दर्शक मिलन वर्मा, निर्माता युवराज बोराडे आणि चालक सागर सोलणकर यांना अटक करण्यात आली आहे. तसेच पोलीसांनी याप्रकरणी एका मराठी अभिनेत्रीला देखील नोटीस पाठवली आहे. ही अभिनेत्री मनसेची कार्यकर्ता असल्याचे सांगितले जातं आहे. संशयित आरोपींनी मड परिसरात एका बंगल्याच्या सुरक्षा रक्षकाला मारहाण करण्यात आली आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर पोलीसांनी गुन्हा दाखल करुन तिघांना अटक करण्यात आली आहे.

मालवणी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनुराग दीक्षित यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित सुरक्षारक्षक 15 ऑक्टोबर दिवशी मालवणी पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यासाठी आला होता. त्याच्या तक्रारीवरुन भारतीय दंड विधान कलम 452, 385, 323, 504, 534 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. व तिघांना अटक करण्यात आली आहे आणि एका महिलेला हजर राहण्याकरिता नोटीस देण्यात आली आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: तुळजापुरात शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न; पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला

Olya Khobryachi Karanji Recipe : ओल्या खोबऱ्याची करंजी बनेल एकदम खुसखुशीत, पीठ मळताना फॉलो करा 'या' ३ टिप्स

Maharashtra Drought: मोठी बातमी! राज्यात दुष्काळ जाहीर होणार, सरकारकडून हालचालींना वेग

Pakistan Afghanistan Conflict: पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ले; कुनार-पक्तिकामध्ये अनेक जण जखमी

दररोज खाव्यात अशा 7 हिरव्या भाज्या; शरीराला मिळतील ‘हे’ फायदे

SCROLL FOR NEXT