राणेंना मुंबईकरांचा आशिर्वाद नव्हे; तळतळाटच मिळणार - भाई जगताप SaamTv
मुंबई/पुणे

राणेंना मुंबईकरांचा आशिर्वाद नव्हे; तळतळाटच मिळणार - भाई जगताप

जेंव्हा कोरोनाचा कठीण काळ होता ऑक्सिजनची रेमडीसिव्हर इंजेक्शनची कमतरता होती तेव्हा कोणी आले नाही उलट आरोपींना वाचवण्यासाठी विरोधी पक्षनेते गेले होते आणि आता तेच जनाशीर्वाद यात्रा काढतात आहेत

जयश्री मोरे

मुंबई : भाजपBJP नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणेNarayan Rane यांनी मुंबईत जनाशीर्वाद यात्राJanashirwad Yatra सुरू केली आहे. राणेच्या या जनाशीर्वाद यात्रेवरती काँग्रेसचेCongress मुंबई अध्यक्ष भाई जगताप Bhai Jagtapयांनी टीका केली आहे. नारायण राणेंना मुंबईकरांचा तळतळाटच मिळणार असल्याच वक्तव्य त्यांनी आज केलं. भाई जगताप यांनी गोवंडीतील पालिकेच्या शताब्दी रुग्णालयात कुपोषित बालकांसाठी उभारलेल्या न्यूट्रीशन केंद्राच्या उदघाटन करण्यासाठी आले होते त्यावेळी त्यांनी राणेंवरती टीका केली.Rane will not get the blessings of Mumbaikars

हे देखील पहा-

भारतीय जनता पक्षातर्फे राज्यात जनआशिर्वाद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये नव्याने केंद्रीय मंत्रीमंडळात वर्णी लागलेल्या नेत्यांचा समावेश आहे. मात्र या सर्व मंत्र्यांमध्ये सर्वात जास्त जनाशीर्वाद यात्रेचा मुद्दा चर्चेत आला तो नारायण राणें यांच्या कारण त्यांनी मुंबईमध्ये येऊन बाळासाहेब ठाकरेंBalasaheb Thackeray यांच्या समाधी स्थळाच दर्शन घेणार असल्याच जाहीर केलं आणि त्यांना आम्ही शिवाजी पार्कवरती येवू देणार नसल्याचा पवित्राच शिवसैनिकांनी घेतला होता मात्र नंतर राणे यांनी बाळासाहेबांच्या समाधीच दर्शन घेतलं आणि 'बाळासाहेबांचे आशिर्वाद सदैव माझ्या डोक्यावरती आहे' असं वक्तव्यही राणे यांनी केलं. मात्र राणे यांनी बाळासाहेबांच्या समाधीच दर्शन घेतलं म्हणून शिवसैनिकांनी चक्क समाधीला दुग्धाभिषेक घालून तिच शुध्दीकरण करुन घेतलं. हा वाद मिटतो ना मिटतो तोच आता भाई जगतापांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा राणेंची यात्रा चर्चेत आली म्हणायला हरकत नाही.

जेंव्हा कोरोनाचा कठीण काळCorona Period होता ऑक्सिजनचीOxygen रेमडीसिव्हर RemdiSever इंजेक्शनची कमतरता होती तेव्हा कोणी आले नाही उलट आरोपींना वाचवण्यासाठी विरोधी पक्षनेते गेले होते आणि आता तेच जनाशीर्वाद यात्रा काढतायत राणेंनी जनतेच्या आशिर्वादासाठी यात्रा काढली असली तरी त्यांनी मुंबईकर जनतेचा तळतळाटच भेटणार असल्याच वक्तव्य आज भाई जगताप यांनी केलं.

शिवसेना सत्तेसाठी लाचार

भाजपनेते नारायण राणे यांनी बाळासाहेबांच्या समाधीच दर्शन घेतलं म्हणून शिवसैनिकांनीShivsainik चक्क समाधीला दुग्धाभिषेक घालून तिच शुध्दीकरण करुन घेतलं आणि तिथे गोमुत्रही शिंपडल. या प्रकरणावरती प्रतिक्रिया देताना राणेंनी शिवसेनेचा चांगलाच समाचार घेतला आम्ही जनतेमध्ये त्यांचे प्रश्न आणि अडीअडचणी समजवून घेण्यासाठी फिरतोय तुमच्यासारखे घरात बसत नाही. शिवाय मी बाळासाहेबांन सोबत काम केलं आहे त्यांनी कधीही सत्तेसाठी तत्वांशी तडजोड केली नाही मात्र आता ते चित्र नाही सेना सत्तेसाठी लाचार झाली आहे आणि त्याच प्रतिक म्हणजेच आजची सोनिया गांधींबरोबरची बैठक आहे असही राणे यावेळी म्हणाले.

Edited By- Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : तुमच्याकडे विधानभवनात सत्ता, आमच्याकडे रस्त्यावर, राज ठाकरेंचा कडक इशारा

Marathi Language: मायबोली मराठी भाषेचा उदय कधी झाला माहिती आहे का?

Marathi Bhasha Vijay Live Updates: केडियाचं ऑफिस उद्ध्वस्त; हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे – मनसैनिकांचा इशारा|VIDEO

Marathi Vijay Melava: हाच तो क्षण! उद्धव - राज ठाकरे २० वर्षांनी एकाच व्यासपीठावर; पाहा भावनिक क्षण

Badlapur Firing Jagdish Kudekar : "पोलिसांच्या चौकशीला सामोरं जायला मी तयार आहे... "; जगदीश कुडेकर यांचं मीडियासमोर स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT