मुंबई: एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीनंतर शिवसेनेला (Shivsena) उतरती कळा लागली आहे. शिवसेनेच्या अनेक मोठ्या नेत्यांनी शिवसेनेशी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेनेही अनेक दिग्गजांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. काल शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांची हकालपट्टी केली आहे. यावर कदम यांनी आज प्रतिक्रीया दिली. यावेळी रामदास कदम यांनी आमदार अनिल परब यांच्यासह आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप केले आहेत.
रामदास कदम यांनी आज माध्यमांशी संवाद साधत शिवसेनेतील बंडखोरीवर प्रतिक्रीया दिली. यावेळी रामदास कदम यांना आश्रू अनावर झाले. कदम (Ramdas Kadam) यांनी शिवसेनेतील जुन्या आठवणी काढल्या. बेळगावसाठी केलेली आंदोलने तसेच मुंबईत मराठी लोकांसाठी केलेली आंदोलने या सर्व गोष्टींची आठवण काढली. तर आपण पक्षात कधी नेते पदाचा राजीनामा देईल अस वाटले नव्हते, असंही कदम म्हणाले.
रामदास कदम म्हणाले, उद्धव ठाकरे यांच्या आजुबाजूला असणाऱ्या लोकांच्यामुळे शिवसेनेवर सध्या ही परिस्थिती आली आहे. उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदा राष्ट्रवादीला (NCP) सोडले पाहिजे. महाविकास आघाडी पाच वर्ष टीकली असती तर शिवसेना संपली असती. एकनाथ शिंदे यांच्यामुळे शिवसेना टीकली आहे. आमचे शिवसेनेसाठी योगदान आहे, ५० वर्ष आम्ही शिवसेनेसाठी घालवली आहेत, असंही कदम म्हणाले.
उद्धव ठाकरे यांचे मार्गदर्शक चुकीचे आहेत. ते त्यांना चुकीचा सल्ला देत आहेत. मी शिवसेना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे. उद्धव ठाकरे यांनीही एक पाऊल पाठिमागे घेतला पाहिजे. आज बाळासाहेब ठाकरे असते तर शिवसेनेवर अशी वेळ आलीच नसती. आमची शिवसेना अभेद्य असली पाहिजे, आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे कडवे शिवसैनिक आहोत. शिवसेना एकत्र येण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे, असंही कदम (Ramdas Kadam) म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.