भाजपचा शिंदे गटाला दणका! नवी मुंबईतील नगरसेवक गणेश नाईकांनी खेचून आणले

नवी मुंबईतील शिंदे गटातील नगरसेवकांनी भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला आहे.
Eknath shinde
Eknath shindeSaam Tv

मुंबई: शिवसेनेचे (ShivSena) ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंड केले. या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले. तर दुसरीकडे या बंडामुळे शिवसेनेत उभी फूट पडल्याचे बोलले जात आहे. राज्यात शिंदे गट आणि भाजप एकत्र येत सरकार स्थापन केले आहे. राज्यातील शिवसेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. नवी मुंबईतील माजी नगरसेवकांनीही शिंदे गटात प्रवेश केला, तर आता दुसरीकडे नवी मुंबईतील शिंदे गटातील नगरसेवकांनी भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला आहे.

नवी मुंबईतील तीन माजी नगरसेवकांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला. शिवसेनेतील या ३ माजी नगरसेवकांनी आज भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला आहे. दिघा येथील माजी नगरसेवक नवीन गवते, दीपा गवते व अपर्णा गवते यांची भाजपमध्ये घरवापसी केली आहे. एक वर्षापूर्वी या तीन माजी नगरसेवकांनी शिवसेनेत पक्ष प्रवेश केला होता. मात्र राज्यातील राजकीय गणितं बदलताच या नगरसेवकांनी आमदार गणेश नाईक (Ganesh Naik) यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये घर वापसी केली आहे.

Eknath shinde
राहुल शेवाळेंना मिळणार केंद्रात मंत्रिपद? शिंदे पंतप्रधान मोदींकडे शब्द टाकणार

एकनाथ शिंदे गटातील ३ माजी नगरसेवकांचा भाजप प्रवेशावरून गणेश नाईकांचे स्पष्टीकरण दिले आहे. या पक्ष प्रवेशात एकनाथ शिंदे गटाचा संबंध नाही. हे नगरसेवक शिवसेनेमध्ये होते आणि ते तांत्रिक दृष्ट्या शिवसेनेमध्ये गेले होते. मनाने मात्र हे नगरसेवक भाजप मध्येच होते. एकनाथ शिंदे आणि माझ्यात एक कणाचे सुद्धा मतभेद नाहीत. जिल्ह्यात विकास करताना शिवसेना भाजप कार्यकर्ते समाजाच्या विकासासाठी एकत्र काम करतील हा आमचा विश्वास, अशी माहिती आमदार गणेश नाईक यांनी दिली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com