ramdas kadam On Uddhav Thackeray Saam tv
मुंबई/पुणे

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी मराठी माणसाला उध्वस्त केलं,रामदास कदमांचा हल्लाबोल

Ramdas Kadam News : 25 वर्ष उद्धव ठाकरे यांच्या हातात मुंबई महापालिका होती. मुंबईतला 60 टक्के मराठी माणूस मुंबई बाहेर फेकला गेला उद्धव ठाकरे जबाबदार नाही का? असा सवालही यावेळी कदम यांनी उपस्थित केला.

Namdeo Kumbhar

Ramdas Kadam on Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी झगडणारी शिवसेना या घोषवाक्यांनी शिवसेनेला जन्म दिला होता. पण उद्धव ठाकरेंनी मराठी माणसाला उध्वस्त केलं, हे वास्तव आहे. मराठी माणसाचे नाव घेण्याचा भविष्यात उद्धव ठाकरे यांना अधिकार नाही, अशी टीका रामदास कदम यांनी केली. गेली 25 वर्ष उद्धव ठाकरे यांच्या हातात मुंबई महापालिका होती. मुंबईतला 60 टक्के मराठी माणूस मुंबई बाहेर फेकला गेला उद्धव ठाकरे जबाबदार नाही का? असा सवालही यावेळी कदम यांनी उपस्थित केला.

विधानसभा निवडणुकीत विजयी झालेल्या शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांचा सत्कार सोहळा काल मुंबईचा मालाड पूर्वेकडील स्वतंत्र वीर सावरकर मैदानात पार पडला. शिवसेना शिंदे गटाचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते मुंबईतील नवनिर्वाचित आमदारांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाबाबत काल पत्रकार परिषद घेतली, ज्यांनी शिवसेनाप्रमुखांचे विचार पायदळी तूडवले, शिवसेनाप्रमुखांचे विचारांशी बेईमानी केली, ज्यांनी काँग्रेस सोबत जाऊन शिवसेना प्रमुखांच्या विचारांना काळिंबा फसले. त्या उद्धव ठाकरेंना शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकामध्ये जाण्याचा पाय ठेवण्याचा नैतिक अधिकार नाही. ते स्मारकाचे कसे अध्यक्ष राहू शकतात, मी देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करणार आहे कुठल्याही परिस्थितीत उद्धव ठाकरे यांची स्मारकाच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी झाली पाहिजे, असे कदम म्हणाले.

स्मारकाचा आणि उद्धव ठाकरे यांचा कोणताही संबंध राहता कामा नये, याची जबाबदारी या शासनाने घेतली पाहिजे. जर का या स्मारकात उद्धव ठाकरे गेले तर शिवसेनाप्रमुखांना वरती दुःख होईल, त्यांच्या मनाला वेदना होतील, असे रामदास कदम म्हणाले. आदित्य ठाकरे आता रोज देवा भाऊ देवा भाऊ करत त्यांना भेटायला जातो. तू राहील नाहीतर मी राहील असे म्हणणारे उद्धव ठाकरे देवा भाऊ आणि सगळे खाऊ असे म्हणायचे. बाप आणि त्याच्या मुलाची पावले देवेंद्र फडणवीस यांनी ओळखली पाहिजे आणि त्यांना कुठे ठेवायचं हे ठरवले पाहिजे, असेही कदम म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'जोपर्यंत CM तोपर्यंत लाडकी बहीण योजना'; मुख्यमंत्री फडणवीसांनी योजनेबाबत दिला शब्द

Shocking: लग्नाला ३ वर्षे झाली, तरीही मुल होत नाही; टेन्शनमध्ये शक्तीवर्धक गोळ्या खाल्ल्या, तरुणासोबत भयंकर घडलं

Crime News: माध्यमिक शाळेची शिक्षिका चॅटिंग करत पाठवायची बाथरूमचे फोटो, नंतर घरी बोलवायची अन्....

RSS संविधान आणि तिरंगा मानत नाही, कारण...; सुजात आंबेडकर नेमकं काय म्हणाले? VIDEO

Dilip Walse Patil : माझं राजकीय वजन कमी झालंय; दिलीप वळसे पाटील असं का म्हणाले?

SCROLL FOR NEXT