Veteran Congress leader and former three-time MLA Ramchandra Moze passes away, leaving behind a legacy of development and education in Pune. saam tv
मुंबई/पुणे

पुण्यातील ३ वेळा आमदार राहिलेल्या दिग्गज नेत्याचे निधन; राज्याच्या राजकारणात शोककळा

Ramchandra Moze Death News Pune Congress Leader: पुण्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि बोपोडी मतदारसंघाचे तीन वेळा आमदार रामचंद्र गेणबा मोझे यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने पुणे जिल्ह्यात शोककळा पसरली असून राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

Akshay Badve

पुणे जिल्ह्यातील बोपोडी विधानसभा मतदारसंघाचे तीन वेळा आमदार राहिलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रामचंद्र गेणबा मोझे यांचे आजारपणामुळे निधन झाले. त्यांच्या निधनाने पुणे आणि परिसरातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.

नगरसेवक ते आमदार; असा राहिला राजकीय प्रवास

रामचंद्र गेणबा मोझे यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात स्थानिक पातळीवरून केली होती. सुरुवातीला त्यांनी नगरसेवक म्हणून काम पाहिले, त्यानंतर त्यांच्याकडे पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदाची महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. आपल्या कुशल नेतृत्वाच्या जोरावर त्यांनी पुढे राज्य पातळीवर ठसा उमटवला. १९८५ ते १९९९ या प्रदीर्घ कालावधीत ते बोपोडी विधानसभा मतदारसंघातून सलग तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले होते.

बालेवाडी आणि बाणेर ही गावे जेव्हा ग्रामपंचायत म्हणून कार्यरत होती, त्या काळात या भागातील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी मोझे यांनी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले होते. त्यांच्याच पुढाकाराने या भागात पहिल्यांदा पुणे महानगरपालिकेची पिण्याच्या पाण्याची योजना कार्यान्वित करण्यात आली होती, ज्याचा फायदा आजही या परिसरातील नागरिकांना होत आहे.

रामचंद्र गेणबा मोझे यांनी केवळ राजकारणातच नव्हे, तर शैक्षणिक क्षेत्रातही मोलाचे योगदान दिले. त्यांचे वडील आणि स्वातंत्र्यसैनिक गेणबा मोझे यांच्या नावाने त्यांनी शैक्षणिक संस्थेची स्थापना केली. आज या संस्थेच्या माध्यमातून बालेवाडी, चऱ्होली, वडगाव शेरी आणि येरवडा या भागात नामांकित शाळा व महाविद्यालये सुरू असून, हजारो विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP New Team: कॉक्रोच जनता पार्टीमध्ये मोठा फेरबदल, नवीन सदस्यांची नियुक्ती, कुणाला मिळाली संधी?

Mysterious Fort : रहस्यांनी भरलेला प्राचीन किल्ला, 'या' गोष्टी तुम्हाला आश्चर्यचकित करतील

चॉकलेटचं आमिष दाखवत 3 वर्षांच्या चिमुकलीला सोबत नेलं, २० मिनिटांनी घरी आणून सोडलं... नराधमाचं संतापजनक कृत्य

जेवताना तोंडी लावण्यासाठी बनवा वांग्याचे कुरकुरीत काप; सोपी आणि चवदार रेसिपी!

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये व्हीएलसीसी संस्थेविरोधात मनसेचे ठिय्या आंदोलन

SCROLL FOR NEXT