Manasvi Choudhary
जेवणाची चव वाढवण्यासाठी किंवा तोंडी लावण्यासाठी एखादा कुरकुरीत पदार्थ हवा असेल, तर वांग्याचे कुरकुरीत काप बनवू शकता.
वांग्याचे कुरकरीत काप बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे. सोप्या पद्धतीने घरी तुम्ही ही रेसिपी ट्राय करा.
वांग्याचे काप बनवण्यासाठी लांब वांगे, तांदळाचे पीठ, बेसन, मसाला, हळद, धने- जिरे पावडर, गरम मसाला, आलं- लसूण पेस्ट, मीठ आणि तेल हे साहित्य घ्या.
सर्वात आधी वांगे स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर त्याचे गोल आणि मध्यम आकाराचे पातळ तुकडे करा.
काप केल्यानंतर ते काही वेळ पाण्यात ठेवा, जेणेकरून त्यांचा काळा रंग पडणार नाही.
एका मोठ्या भांड्यात लाल तिखट, हळद, धने-जिरे पावडर, गरम मसाला, आलं-लसूण पेस्ट, आमचूर पावडर आणि चवीनुसार मीठ एकत्र करून एक मऊसर पेस्ट तयार करा.
आता वांग्याचे काप पाण्यातून बाहेर काढून या मसाल्यामध्ये दोन्ही बाजूंनी चांगले कोट (मसाला लावून) करून घ्या. हे काप १० ते १५ मिनिटे मुरण्यासाठी ठेवा.
मसाले मुरल्यानंतर प्रत्येक कापाला दोन्ही बाजूंनी तांदळाचे पीठ किंवा रवा हलकासा लावून घ्या. यामुळे वांग्याचे काप अतिशय कुरकुरीत होतात.
गॅसवर कढईमध्ये गरम तेलामध्ये वांग्याचे काप सोनेरी रंग आणि कुरकुरीत होईपर्यंत चांगले फ्राय करून घ्या.