मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant) नेहमी चर्चेत असते. ती मुंबईतील सामान्य लोकांमध्ये लगेच मिक्स होते, तिचे या संदर्भात व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होतात. त्यामुळे ती अनेकांचे लक्ष वेधून घेते. पण ती आता अशा कृतीमुळे राखी सावंत अडचणीत आली आहे.
राखी सावंत (Rakhi Sawant) काही दिवसांपूर्वी मुंबईतील अंधेरी येथे काहीतरी खरेदी करण्यासाठी कारमधून खाली उतरली होती. मात्र ती गाडी बाजूला न लावता मधल्या रस्त्यावर उभी करून तिथून निघून गेली होती. त्यामुळे तिच्या गाडीच्या मागे गाडीच्या रांगा लागल्या होत्या. राखीचे हे कृत्य कॅमेऱ्यात कैद झाले आहे. राखी सावंत पुन्हा गाडीजवळ आली. यावेळी ती वाहनधारकांना जहा हम खडे होते है लाईन वहीं से शुरु होती है असं म्हणत तिच्या कारमध्ये बसून पुढच्या प्रवासाला जाते. (Rakhi Sawant Latest News)
राखी सावंतच्या (Rakhi Sawant) या व्हिडिओवर चाहत्यांनी तिच्या या कृतीवर नाराजी व्यक्त केली. एका यूजरने लिहिले, हे अत्यंत चुकीचे आहे, ती अशा प्रकारे सर्वसामान्यांच्या वाहतुकीला अडथळा आणू शकत नाही, मुंबई पोलिसांनी याप्रकरणी कारवाई करावी.
दुसरा युजर म्हणतो, "ये लडाई करवायेगी भाई किसी दिन." पाचव्याने तर केस कराे इस नौटंकी औरत पर." असे म्हटलं आहे. सहाव्याने लिहिले, "इतनी मार मरेंगे ना ट्रॅफिक वाले पुरा अमिताभ बच्चन उतरेंगे." दरम्यान नेटीझन्सच्या मागणीनंतर मुंबई पाेलिसांनी संबंधित ठिकाण काेणतं आहे याची माहिती नेटीझन्सला विचारली आहे.
अंधेरी लोखंडवाला ओशिवरा सिटिझन्स असोसिएशनने राखी सावंतचा हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला, यानंतर मुंबई पोलिसांनी (Police) या प्रकरणी प्रतिक्रिया दिली. "आम्ही वाहतुकीला अडथळा आणणाऱ्या वाहनाविरुद्ध चलन काढले आहे." मुंबईत असे केल्यास ५०० रुपये दंड भरावा लागतो, अशी माहिती ओशिवरा वाहतूक विभागाचे वरिष्ठ निरीक्षक दिलीप भोसले यांनी दिली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.