Anil Deshmukh, Nawab Malik Saam Tv
मुंबई/पुणे

Rajya Sabha Election: मलिक, देशमुख यांना मतदान करता येणार का? MVA चे गणित बिघडेल?

नवाब मलिक, अनिल देशमुख यांना राज्यसभेसाठी मतदानसाठी परवानगी मिळावी यासाठी विशेष पीएमएलए न्यायालयात अर्ज केले आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: राज्यात सध्या राज्यसभेच्या निवडणुकीवरुन चांगलेच वातावरण तापले आहे. महाविकास आघाडीने (Mahavikas Aaghadi) आज मुंबईत एका हॉटेलमध्ये सर्व आमदारांची बैठक घेतली. या बैठकीला १३ अपक्ष आमदारांनी उपस्थिती लावत महाविकास आघाडीला पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीचे पारडे जड असल्याचे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत, पण राष्ट्रवादीचे नवाब मलिक आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांना राज्यसभेसाठी मतदानसाठी परवानगी मिळावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) नेत्यांनी विशेष पीएमएलए न्यायालयात अर्ज केले आहेत.

अनिल देशमुख (Anil Deshmukh) आणि नवाब मलिक यांच्या मतदान करण्याकरिता मागितलेल्या परवानगीवर ईडीकडून उत्तर दाखल झाले आहे. अनिल देशमुख, नवाब मलिक यांना राज्यसभा निवडणुकीत मतदाना करिता परवानगीला ईडीने (ED)विरोध दर्शवला आहे. यामुळे आता महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली आहे. (Rajya Sabha Election)

राष्ट्रवादीचे (NCP) नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांचा मतदानाचा अधिकार धोक्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्यसभेसाठी या दोन्ही नेत्यांना मतदान करता येणार नसल्याचे बोलले जात आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाला कळवण्याची माहिती सूत्रांची दिली आहे. महाविकास आघाडीची दोन मतं कमी झाली तर गणित बिघडण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.

कायदा काय म्हणतो?

नवाब मलिक आणि माजी मंत्री अनिल देशमुख यांनी राज्यसभेच्या मतदानाला जाण्यासाठी परवागनी मिळावी यासाठी अर्ज केला आहे. या मागणीवर ईडीने एक प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. या ईडीने कायद्याचा हवाला देत मतदानाला बाहेर जाता येणार नसल्याचे म्हटले आहे. ईडीने १९५१ कलम ६२(५) चा हवाला दिला आहे. ' जर एखादा व्यक्ती जेलमध्ये असेलतर त्या व्यक्तीला कोणत्याही निवडणुकीत मतदान करता येणार नाही, या कायद्यामध्ये अशी तरतूद आहे. अस यात म्हटेल आहे.

महाविकास आघाडीच्या बैठकीला १३ अपक्ष आमदार आले

२९ अपक्ष आमदारांपैकी १३ आमदारांनी आज महाविकास आघाडीच्या बैठकीला उपस्थिती लावली आहे. तर एमआयएम आणि बहुजन विकास आघाडी, समाजवादी पार्टीच्या आमदारांनी बैठकीला दांडी मारली आहे. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी आमदारांना मार्गदर्शन केले.

आमदार आशिष जैस्वाल, किशोर जोरगेवर, देवेंद्र भुयार, गीता जैन, मंजुळा गावित, श्यामसुंदर शिंदे, नरेंद्र भोंडेकर, संजय मामा शिंदे, चंद्रकांत पाटील, विनोद निकोले, विनोद अग्रवाल, राजेंद्र याद्रावकर, शंकरराव गडाख या तेरा आमदारांनी महाविकास आघाडीच्या बैठकीला उपस्थिती लावली आहे. विधानसभेत एकुण २९ आमदार अपक्ष आहेत. यातील १३ आमदार आज उपस्थित होते, राहीलेले १६ आमदार नेमके कोणाला मतदान करणार हे अजुनही स्पष्ट झालेले नाही. (Rajya Sabha Election)

Edited By- Santosh Kanmuse

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tulsi Kadha Recipe : पावसात भिजल्यामुळे घसा खवखवतोय? पटकन प्या ग्लासभर तुळशीचा काढा

Maharashtra Rain Live News : उल्हास नदीवरील पूल पाण्याखाली; महामार्ग वाहतुकीस बंद

Beed Crime News : "आम्ही सुरेश धसांची माणसं ... ", १२ हजारांच्या वादातून तरुणाचं अपहरण करून मारहाण

Rain Grant Scam : अतिवृष्टी अनुदान घोटाळा; अखेर २८ कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल, २५ कोटींचा अपहार केल्याचा ठपका

Hero Glamour X125 विरुद्ध Honda Shine 125; फीचर्स, मायलेज, कोणती बाईक तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे?

SCROLL FOR NEXT