महाविकास आघाडीची ती खेळी यशस्वी; बैठकीला १३ अपक्ष आमदार आले

या बैठकीत शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन करुन, आपण राज्यसभेची जागा जिंकू असा विश्वास व्यक्त केला.
Mahavikas Aaghadi
Mahavikas AaghadiSaam Tv
Published On

मुंबई: राज्यसभा निवडणुकीच्या (Election) पार्श्वभूमीवर आज मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये आज महाविकास आघाडीच्या आमदारांची बैठक झाली. या बैठकीला राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेसचे दिग्गज नेते मल्लिकार्जुन खर्गे, नाना पटोले उपस्थित होते. या बैठकीत शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन करुन, आपण राज्यसभेची जागा जिंकू असा विश्वास व्यक्त केला. विशेष म्हणजे या बैठकीला अपक्ष आमदारांचीही उपस्थिती होती.

२९ अपक्ष आमदारांपैकी १३ आमदारांनी आज महाविकास आघाडीच्या बैठकीला उपस्थिती लावली आहे. तर एमआयएम आणि बहुजन विकास आघाडी, समाजवादी पार्टीच्या आमदारांनी बैठकीला दांडी मारली आहे. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी आमदारांना मार्गदर्शन केले.

Mahavikas Aaghadi
मुंबईत कोरोनाचा उद्रेक; एकाच दिवसात रुग्ण झाले दुप्पट

२०१९ मध्ये महाविकास आघाडी स्थापन होत असताना २५ आमदारांनी सर्थन दिले होते. यातील १३ आमदारांनी बैठकीला उपस्थिती लावली. काही दिवसापूर्वी ठाकरे सरकारवर आमदार आशिष जैस्वाल आणि किशोर जोरगेवार यांनी नाराजी व्यक्त केली होती त्यांनी या बैठकीला हजेरी लावत महाविकास आघाडीला (Mahavikas Aaghadi) पाठिंबा दिला आहे.

Mahavikas Aaghadi
प्रदीप भिडे आवाजाने घराघरांत पोहचले; मुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली

या तेरा आमदारांची बैठकीला उपस्थिती

आमदार आशिष जैस्वाल, किशोर जोरगेवर, देवेंद्र भुयार, गीता जैन, मंजुळा गावित, श्यामसुंदर शिंदे, नरेंद्र भोंडेकर, संजय मामा शिंदे, चंद्रकांत पाटील, विनोद निकोले, विनोद अग्रवाल, राजेंद्र याद्रावकर, शंकरराव गडाख या तेरा आमदारांनी महाविकास आघाडीच्या बैठकीला उपस्थिती लावली आहे. विधानसभेत एकुण २९ आमदार अपक्ष आहेत. यातील १३ आमदार आज उपस्थित होते, राहीलेले १६ आमदार नेमके कोणाला मतदान करणार हे अजुनही स्पष्ट झालेले नाही.

कोणताही आमदार फुटणार नाही

उद्धव ठाकरे म्हणाले, महाविकास आघाडीचे चारही उमेदवार विजयी होतील. कोणी कितीही प्रयत्न केले तरी महाविकास आघाडीचे चारीच्या चारी उमेदवार उमेदवार निवडणून राज्यसभेवर जाणारच. ही लढाई शंभर टक्के जिंकणार. राज्यसभा आणि विधान परिषदेच्या विजयानंतर जल्लोष करणार. कोणताही आमदार फुटणार नाही. महाविकास आघाडीचेच उमेदवार जिंकणार, असा विश्वास मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.

Edited By- Santosh Kanmuse

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com