प्रदीप भिडे आवाजाने घराघरांत पोहचले; मुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली

प्रदीप भिडे यांचे प्रदीर्घ आजाराने त्यांचे मुंबईत निधन झाल्याची माहिती डीडी सह्याद्रीने ट्विटरवरुन दिली.
Pradeep Bhide
Pradeep BhideSaam Tv

मुंबई: वृत्त निवेदनातून आपल्या आवाजाने घराघरात पोहचलेले बातम्या, घडामोडींच्या क्षेत्रातील जाणकार आणि निरलस, निखळ व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ वृत्त निवेदक प्रदीप भिडे (Pradeep Bhide) यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली वाहिली आहे.

Pradeep Bhide
मध्यरात्री दरोडेखोर घरात शिरले; निर्दयीपणे लहान मुलाला पंख्याला लटवकले अन्...

मुख्यमंत्री (Uddhav Thackeray) शोकसंदेशात म्हणतात, दूरचित्रवाणी वृत्त वाहिन्यांचे युग सुरू होण्या आधीच दिवंगत भिडे यांनी प्रादेशिक बातम्या आणि त्यातही मराठी वृत्त निवेदनात एक मापदंड निर्माण केला. त्यांचा आवाज व्यक्तीमत्वाप्रमाणेच भारी भक्कम होता. त्यांची वृत्त निवेदनाची, सुत्रसंचलनाची शैली ही त्यांची ओळख बनून घराघरात पोहोचली. मराठी बातम्यांमधील शब्दांचे उच्चारण ते संयमीत सादरीकरण यासाठी ते सदैव लक्षात राहतील. ज्येष्ठ निवेदक प्रदीप भिडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

ज्येष्ठ वृत्तनिवेदक प्रदीप भिडे यांचं निधन

सुप्रसिध्द वृत्तनिवेदक प्रदीप भिडे (Pradeep Bhide) यांचे आज निधन झाले. वयाच्या ६५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दूरदर्शनमध्ये त्यांनी ४२ वर्ष त्यांनी वृत्तनिवेदन केले आहे. प्रदीर्घ आजाराने त्यांचे मुंबईत (Mumbai) निधन झाल्याची माहिती डीडी सह्याद्रीने ट्विटरवरुन दिली. बातम्या सांगण्याची खास शैली आणि भारदस्त आवाज यामुळे ते दूरदर्शनवरील बातम्यांची ओळख बनले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com