Political News, Dilip Mohite News, Uddhav Thackeray Latest Marathi News Saam Tv
मुंबई/पुणे

Video: राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते नाराज; मतदानापूर्वीच मुख्यमंत्र्यांवर टीका

आमच्याकडे दुर्लक्ष झालं अशी खदखद मोहितेंनी व्यक्त केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्राची कुलकर्णी

मुंबई - राज्यात सध्या राज्यसभा निवडणुकीसाठीचे मतदान पार पडत आहे. आजच्या या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांकडून आपापल्या परीने विजयाची तयारी केली जात आहे. राष्ट्रवादी (NCP) आणि काँग्रेसने (Congress) तर धोका टाळण्यासाठी आपल्यासाठीच्या मतांचा कोटा वाढवून घेतला आहे. मात्र राष्ट्रवादी राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते (Dilip Mohite Patil) नाराज असल्याची माहिती मिळत आहे. (Dilip Mohite Latest Marathi News)

खेड-आळंदीचे आमदार दिलीप मोहिते यांनी ऐन मतदानाच्या दिवशी आपली नाराजी व्यक्त केली आहे. आमच्याकडे दुर्लक्ष झालं अशी खदखद मोहितेंनी व्यक्त केली आहे. आमच्या प्रकल्पांकडे, कामांकडे सरकारचं लक्ष नाही असा आरोप त्यांनी केला. दिलीप मोहिते यांची नाराजी दूर करण्यासाठी अजित पवार आणि जयंत पाटील यांच्याकडून त्यांना आश्वासन देण्यात आलं आहे. त्यानंतर "मतदान करतो मात्र कामं करा" अशी मागणी दिलीप मोहिते यांनी केली आहे.

मुख्यमंत्री कधीच वेळ देत नाहीत, असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांवरही आपली नाराजी व्यक्त केली आहे. तर अजित पवार वगळता इतर कोणताही मंत्री आपल्याकडे लक्ष देत नाही अशी भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे.

मोहिते पाटलांनी जाहिरपणे नाराजी व्यक्त केल्याने जयंत पाटील, प्रफुल पटेल, अजित पवार यांच्या कडून त्यांची नाराजी दुर करण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यासाठी एका बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

दरम्यान, २४ वर्षानंतर राज्यात राज्यसभेच्या निवडणुकीत अशा प्रकारे मतदान होत असल्याने कमालीची चुरस निर्माण झाली आहे. या निवडणुकीत घोडेबाजार होणार असा आरोप सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनी एकमेकांवर केला होता. त्यामुळे प्रत्येकाने आपआपले आमदार एका सुरक्षित ठिकाणी ठेवले होते. त्यामुळे आता या निवडणुकीत नेमका कोणता पक्ष बाजी मारणार याकडेच सर्वांचं लक्ष लागलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दुष्काळाच्या मागणीसाठी शेकडो शेतकरी तहसील कार्यालयावर धडकले; सोयाबीन जाळून निषेध

Gold Rate Today: पितृपक्ष सुरू होताच सोनं-चांदी अचानक स्वस्त! सुवर्णनगरीत मोठी घसरण; वाचा आजचे नवे दर

यायचं असेल तर आमच्यासोबत या! राष्ट्रवादी विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं विधान

Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर अपघाताचा थरार, एकमेकांना धडक देत २ वाहने दरीत कोसळली

Women Health Tips: मैत्रीण किंवा बहिणीवर विश्वास असला तरी या ७ वस्तू कधीही शेअर करु नका; जाणून घ्या कारणं

SCROLL FOR NEXT