Ajit Pawar On Rajya Sabha Election 
मुंबई/पुणे

Rajya Sabha Election:राज्यसभेची निवडणूक या तारखेला होणार; अजित पवार म्हणाले, सातारा जिल्ह्याला उमेदवारी, कोणाची लागणार वर्णी?

Ajit Pawar On Rajya Sabha Election: लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक मुंबईत पार पडली. यात त्यांनी राज्यसभेसाठी साताऱ्यातून उमेदवार दिला जाणार असल्याचं सुतोवाच अजित पवार यांनी केलेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुनिल काळे, साम प्रतिनिधी

मुंबई: लोकसभा निवडणुकीचे पाच टप्पे पार पडल्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसची मेळावा पार पडला. या मेळाव्यात अजित पवार यांनी राष्ट्रवादीला लोकसभेत कमी जागा का मिळाल्या? राज्यसभेचे जागा मिळणार का नाही याबाबत भूमिका स्पष्ट केलीय. राज्यसभेची जागा सातारा जिल्ह्याला मिळणार असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर राज्यसभेसाठी कोणाची वर्णी लागणार याची चर्चा सुरू झालीय.

मेळाव्यात बोलतांना छगन भूजबळ यांनी केलेल्या मागणीला दुजोरा दिला. मागच्या लोकसभेच्यावेळी ४१ जागा भाजप युतीच्या होत्या, तर विरोधक ७ जागेवर होते. त्यामुळं आपल्याला यंदा जागा कमी मिळाल्या. राष्ट्रवादी काँग्रेसला साताऱ्यासाठी राज्यसभेची जागा मिळणार असल्याने इतरांनी मागणी करून नये, असं अजित पवार मेळाव्यात बोलतांना म्हणाले. लोकसभेत साताऱ्याची जागा भाजपला गेल्याने राज्यसभा खासदार असलेल्या उदयनराजे भोसले यांची रिक्त होणार आहे. त्या जागेच्या बदल्यात राष्ट्रवादीला केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांची राज्यसभेची जागा देण्यात येणार आहे.

दरम्यान आज झालेल्या बैठकीत अजित पवारांनी केलेल्या विधानामुळे लोकसभा जागा वाटपावेळी ठरलेल्या फॉर्मुल्यावर शिक्कमोर्तब झालंय. तर प्रफुल्ल पटेल यांनी त्यांच्या राज्यसभेचा राजीनामा दिलाय. त्याच्या बदल्यात राष्ट्रवादीच्या दुसऱ्या एका नेत्याला संधी मिळणार आहे. दरम्यान राज्यसभेसाठी पाठवण्यात येणार उमेदवार हा सातारा जिल्ह्यातील असणार आहे.

सातारा जिल्ह्याला राज्यसभेची जागा मिळणार असल्याचं अजित पवारांनी सांगितल्यानंतर कोणाची वर्णी लागणार याची चर्चा राज्यात सुरू झालीय. साताऱ्यातून आमदार मकरंद पाटील यांचे बंधू नितीन पाटील यांना लोकसभेची उमेदवारी दिली जाण्याची शक्यता होती. मात्र जागा भाजपकडे गेल्याने त्यांची संधी हुकली. त्यामुळे आता राज्यसभेवर नितीन पाटील यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.

मागील निवडणुकीत निवडून आलेल्या जागांचा निकष त्यावेळी लावण्यात आला होता. कोणत्या पक्षाकडे निवडून आलेली कोणती जागा आहे, त्या आधारावर जागा वाटप करण्यात आलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला त्या आधारावर कमी जागा आल्या होत्या. त्यावरून आज मुंबईत सुरू असलेल्या बैठकीत छगन भुजबळ यांनी अजित पवारांसमोर मोठी मागणी केली.

लोकसभेसारखी विधानसभेला जागा वाटपाबाबत खटपट होता कामा नये. “आपण महायुतीमध्ये आलो, तेव्हा त्यांनी ८०-९० जागा देण्याचा शब्द दिला होता. विधानसभेला महायुतीमध्ये योग्य वाटा मिळाला पाहिजे, असं छगन भुजबळ म्हणाले. त्यावर बोलताना लोकसभेच्या निकालावर बोलतांना अजित पवार म्हणाले की, लोक देतील त्याचा कौल मान्य करून आपण पुढं जायला हवं, अशी भूमीका सर्वांनी मान्य करायला हवी.

आपण वेगळा निर्णय घेतल्यानंतर ही पहिलीच निवडणूक होती. परंतु मागच्यावेळी ४१ जागा भाजप युतीच्या होत्या

तर विरोधक 7 जागेवर होते. त्याच्याआधारे यंदाच्या लोकसभेची जागा वाटप केली गेल्याचं अजित पवार म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: डॉ.आनंद नाडकर्णींच्या पार्थिवाचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतलं अंत्यदर्शन

Gold Price : अचानक किंमती घसरल्या! चांदी ₹१७०००, सोनं ₹३००० ने स्वस्त; वाचा 24K, 22K, 18K गोल्डचे ताजे दर

Nashik : नाशिक हादरलं! पत्नीचा खून करून पतीने केली आत्महत्या; धक्कादायक कारण समोर

पुण्यातील रुग्णालयात बॉम्ब ठेवणारा आरोपी कोण? नागपूर कनेक्शन उघड, धक्कादायक माहिती समोर

IPL 2026: मुंबईने पंजाबचा खेळ बिघडवला! आता प्लेऑफचं समीकरण काय? कुणाला किती संधी? वाचा नेमकं गणित

SCROLL FOR NEXT